लायन्सक्लब ऑफ उरणच्या वतीने स्तनपान केंद्राची निर्मिती
सिटी बेल लाइव्ह / सुभाष कडू (उरण)
राज्य सरकारच्या आदेशाने धार्मिकस्थळा पासून रूग्णालया पर्यंत आणि रेल्वे स्थानकां पासून बसस्थानका पर्यंत मातांना आपल्या बाळाला वेळेवर स्तनपान करण्यास मिळावे यासाठी स्तनपान केंद्राची स्थापना करण्यास सांगितली होती.व त्या केंद्राला आपल्या बाळाच्या स्तनपाना साठी जीवाची बाजी लाऊन रायगड किल्ल्याच्या खोल दरीतून उतरणाऱ्या व या पराक्रमाचा गौरव छत्रपती शिवाजी महाराज्यानी आपल्या हस्ते केलेल्या हिरकणीच नाव द्यायला सांगितल होत.त्या नुसार लायन्स क्लब ऑफ उरण ने उरण बस स्थानकात स्तनपान केंद्राची निर्मिती केली.या कक्षचे उद्घाटन उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
उरणच्या बस स्थानकातून एस.टी.बसच्या सुमारे 377 फेऱ्या होत असतात त्यामुळे या बस स्थानकात नेहमीच प्रवाश्यांची गर्दी असते. आपले बाळ दुधा विना उपाशी राहू नये असे प्रतेक आईंला वाटत असते.परंतु उरण बस स्थानकात स्तनपाना साठी आवश्यक असणाऱ्या हिरकणी कक्षाची सुविधा नसल्याने मतांचा नाईलाज होत असे. ही काळाची गरज लक्षात घेऊन उरणमधील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब ऑफ उरण ने 30 जुन रोजी उरण एस.टी. बस स्थानकात मातांना आपल्या बाळांना स्तनपान करण्या साठी हिरकणी कक्ष अर्थात स्तनपान केंद्राची निर्मिती केली आहे.
या कक्षचे उद्घाटन उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन डॉ.अमोल गिरी,सेक्रेटरी ला.समिर तेलंगे,खजिनदार ला.संध्यारणी ओहोळ, ला.सदानंद गायकवाड,ला.चंद्रकांत ठक्कर,ला.अॅड. दत्तात्रय नवाळे,ला.डॉ.समिर गाडे,ला.संजीव अग्रवाल. ला.नरेन्द्र ठाकूर,ला.साहेबराव ओहोळ, ला.डॉ.प्रिती गाडे,ला.अमरीन मुखरी,ला.दमयंती ठाकूर,ला.संपूर्ण थळी उरण एस.टी आगार व्यवस्थापक सतीश मालसे,सा.वाहतूक निरीक्षक एस.के.म्हात्रे. वरिष्ठ लिपिक शशी कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
Be First to Comment