डॉ. मनीषा कायंदे यांच्या प्रयत्नाने वरिष्ठ महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप स्थगित
सिटी बेल | मुंबई | उमेश भोगले |
वरिष्ठ महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यासाठी २० डिसेंबर पासून पुकारलेला संप शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्या प्रयत्नाने स्थगित झाला आहे.
१५ डिसेंबर रोजी शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्या उपस्थितीतीत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सोबत शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस डॉ. आर.बी सिंग व इतर पदाधिकारी यांच्यासोबत सविस्तर बैठक झाली होती. या बैठकीत संपावर न जाण्याचे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व डॉ. मनीषा कायंदे यांनी केले. दीड वर्षांच्या कालावधीनंतर वरिष्ठ महाविद्यालय सुरू झालेली आहेत आणि आताच कुठे मुले कॉलेजमध्ये येऊन लागली आहेत त्यामुळे संपावर जाऊन विद्यार्थ्यांचा हिरमोड करून त्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये असे आवाहन देखील करण्यात आले होते.
शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर रोजी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस डॉ. आर.बी सिंग यांनी पुन्हा एकदा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्स करून हा संप स्थगित करीत असून आमच्या मागणीवर विचार करावा असे मत व्यक्त केले. महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सकारात्मक असून वरिष्ठ महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे डॉ. मनीषा कायंदे यांनी आभार मानले.













Be First to Comment