Press "Enter" to skip to content

येत्या रविवारी महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

पनवेल उरण महा विकास आघाडीच्या वतीने कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन

पहा महाविकास आघाडीच्या नेत्यांची संपूर्ण पत्रकार परिषद 👇👇

सिटी बेल | पनवेल |

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला कलाटणी देत सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केलेल्याला एव्हाना दोन वर्ष उलटून गेली.एकीकडे विरोधकांच्या कुरापतींना पुरून उरत दुसरीकडे महा विकास आघाडी सरकारने भरीव कामगिरी करून दाखविली आहे.कोरोना कालखंड, चक्री वादळे महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती, लसीकरण मोहीम या सगळ्या आघाड्यांवर या सरकारने उत्तम कामगिरी बजावली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस,शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी या महाविकासआघाडी मधील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

रविवार दिनांक 19 डिसेंबर रोजी पनवेल येथील काळण समाज हॉल मध्ये या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सकाळी 10.30 वाजल्यापासून मेळाव्यास प्रारंभ होईल.या मेळाव्याला मा. श्री. बाळाराम पाटील आमदार विधानपरिषद,मा. श्री. मनोहर भोईर मा. आमदार / जि. प्रमुख,मा. श्री. महेंद्रशेठ घरत कॉ. जिल्हाध्यक्ष रायगड,मा. श्री. प्रशांत पाटील प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी,मा. श्री. आर. सी. घरत कॉ. जिल्हाध्यक्ष पनवेल,मा. श्री. शिरीष घरत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख,मा. श्री. जे. एम. म्हात्रे उदयोगपती, शेकाप नेते,मा. श्री. सतिश पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी पनवेल,मा. श्री. अनिल नाईक जिल्हाध्यक्ष सपा रायगड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे मेळाव्याचे निमंत्रक, पनवेल उरण महा विकास आघाडीचे अध्यक्ष बबन दादा पाटील आणि पनवेल उरण महा विकास आघाडीचे सचिव सुदाम पाटील यांनी सांगितले.

या मेळाव्याची माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, पमपा विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, काँग्रेस महानगरपालिका जिल्हाध्यक्ष आर सी घरात, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, शिवसेना महानगर प्रमुख रामदास शेवाळे, नगरसेवक गणेश कडू, समाजवादी पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल नाईक, मा.नगरसेवक शंकरशेठ म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.