Press "Enter" to skip to content

ओबीसी समाजावरील अन्यायाच्या निषेध

ओबीसी जनमोर्चाच्या वतीने पनवेलमध्ये रास्ता रोको व निदर्शने

सिटी बेल | पनवेल | विठ्ठल ममताबादे |

मा. सुप्रिम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी लोकप्रतिनिधी आरक्षण कायम ठेवण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र सरकारचा ओबीसी जनमोर्चाच्या वतिने खांदा कॉलोनी पनवेल येथे महिला प्रदेशाध्यक्ष श्रुती म्हात्रे यांनी रास्ता रोको आंदोलन व जनआक्रोष निदर्शने करून जाहीर निषेध केला.

आरक्षण आमच्या हक्काचे.,,,! नाही कुणाच्या बापाचे..! ओबीसींचे आरक्षण संपवणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा निषेध असो..! जातवार जनगणना नाकारणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो..! ओबीसींना निधी न देणाऱ्या अर्थ मंत्र्यांचा निषेध असो.! ओबीसी एकजुटीचा विजय असो..! छत्रपती शिवाजी महाराज कि जय..! आरक्षणाचे जनक लोकराजा शाहू छत्रपतींचा विजय असो..! महात्मा जोतिराव फुलेंचा विजय असो.! विश्वरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय अशा घोषणांनी पनवेल मधील खांदा कॉलोनी परिसर दणाणून गेला.

यावेळी श्रुती म्हात्रे यांनी गेले नऊ महीने महाराष्ट्र सरकारने ओबीसी लोकप्रतिनिधी आरक्षण टिकविण्यासाठी अक्षम्य दिरंगाई केल्यानेच, तसेच इंपेरिकल डाटा तयार करण्यासाठी महाराष्ट्राचे अर्थमंत्री जाणिवपुर्वक टाळाटाळ करतात याचा निषेध केला. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का लावून राज्य सकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. नाकर्त्या केंद्र सरकारने ओबीसींची जातवार जनगणना करण्यास टाळाटाळ करत आहे याचाही निषेध केला.तसेच मुंबई सह महाराष्ट्रातील महानगरपालिका व नगरपालिका च्या निवडणुका ओबीसी आरक्षणा शिवाय होऊच नये अशी मागणी या रास्ता रोको निमित्ताने केली.

सदरच्या आंदोलनात ओबीसी नेते श्री बाजपेयीं, सान्नि वलिका, देवीदास थळी यांच्या सह अनेक ओबीसी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.