इंस्पायर अवार्ड राज्य स्तरासाठी वेदांगी पोखरकरची निवड
सिटी बेल | नवीन पनवेल | विजयकुमार जंगम |
केंद्र शासनाच्या इंस्पायर अवार्ड योजनेतून प्रत्येक वर्षी इनोवेटिव प्रोजेक्ट तयार केले जातात यासाठी सन 2020-21 मध्ये जिल्हा स्तरावर 42 प्रकल्पाची निवड झाली होती या मधे के.आ.बांठिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल च्या इयत्ता 10 वी मधील वेदांगी पोखरकर आणि प्रियंका खरात यांची निवड झाली आहे.
रायगड जिल्ह्यातून 437 मुलांचे नामांकन झाले होते. जिल्हास्तरावरून राज्यस्तर इंस्पायर अवार्ड साठी इयत्ता दहावी ग मधून वेदांगी भास्कर पोखरकर या विद्यार्थिनीची निवड झालेली आहे.
याबद्दल तिचे अभिनंदन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बी. एस. माळी, माजी शिक्षणाधिकारी कांबळे रायगड जिल्हा मधामिक विभाग, पर्यवेक्षक जालिंदर कुंभार व बापूराव महाजन आणि पनवेल तालुका गणित विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील व सदस्य देवयानी मोकल मॅडम आणि विलास पाटील उपस्थित होते. मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती विद्या जगताप आणि श्रीमती संध्या पराते तसेच उत्कृष्ट व्हिडिओ एडिटिंग करून सादर करणारे विजयकुमार जंगम सर यांचेही प्राचार्य भगवान माळी सर यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. वेदांगी पोखरकर हीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.








Be First to Comment