Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आयोजन

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री 2021 शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त ठाणे बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कर्जत तालुका अध्यक्ष सागर शेळके यांनी कर्जत तालुका मर्यादित ग्रामीण व शहरी भागातील युवा खेळाडू साठी सागरभाऊ शेळके श्री 2021 शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

यावेळी माजी आमदार सुरेश लाड,युवकचे ज़िल्हा अध्यक्ष अंकित साखरे, शेखर पिंगळे,भूषण पाटील हिरा दुबे, वंदना थोरवे यांच्या हस्ते कार्यक्रमाची दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची स्पर्धेची सुरुवात करण्यात आली, यावेळी कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील लोकांसाठी काम करणाऱ्या महिला सबली करणाच्या साक्षत्कार करणाऱ्या ठमाताई पवार, आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी धडपड करणाऱ्या कु. सविता पवार, तसेच नॅशनल लेवल पॉवर लिफ्टिंग मध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करत असताना गोल्ड मेडल मिळवणाऱ्या आणि स्ट्रॉंग म्यान ऑफ इंडिया अवॉर्ड मिळवणारे कु. बबन झोरे, मिस नवी मुंबई बेस्ट स्माईल अवॉर्डची मानकरी कु. जान्हवी कदम, कर्जत तालुक्यातील पोलीस भरती मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेलं महाराष्ट्रात प्रथम आलेली कु. मनस्वी बडेकर, कु हर्षदा ठोंबरे, कु. पूनम ठाकरे, कु. योगेश शिर्के, कु. कैलास हजारे यांना सन्मानित करण्यात आले, तसेच सागर भाऊ शेळके श्री किताबाचा मानकरी ऑलंपिया जिम चा जयेश भोईर यांनी पटकावला, बेस्ट पोझर अवॉर्ड रोशन खडे यांनी मिळवला, ग्रुप विनर मध्ये प्रथम आलेले 55kg मध्ये नरेश चव्हाण ऑलंपिया जिम, 60 kg मध्ये योगेश बार्शी ओलम्पिया जिम, 65kg जयेश भोईर ऑलंपिया, 70kg मोहन कांबरी फिटनेस फर्स्ट, 75kg हर्षल मोरे जी व्ही आर जिम हे ग्रुप विनर राहिले.

यावेळी जेष्ठ नेते तानाजी चव्हाण,सुरेश टोकरे, तालुका अध्यक्ष भगवान चंचे,एकनाथ धुळे, मधुकर घारे, शरद लाड, राजेश लाड ,उमेश गायकवाड, प्रतीक्षा लाड, रंजना धुळे, भास्कर दिसले,चिंधू तरे, विरेंद्र जाधव,राजू हजारे, सोमनाथ पालकर, भूषण पेमारे,नोमान नजे, रमेश लदगे, ऋषी भगत, भास्कर लोंगले, संदीप पाटील, श्याम पाटील, मालू निरगुडा, तेजस भासे, निलेश बडेकर, शाहनवाज पानसरे,फाईक भाई, मनोहर कांबरी, अनिल ठाणगे, योगेश थोरवे, महेंद्र ठोंबरे ,चेतन ठाणगे, राजेश गायकर, महेंद्र जाधव, प्रवीण लोंगले,आपुराज गायकवाड,रुपेश कोंडे,डी. के. शेंडे, अमर पाटील,योगेश कांबरी,भरत कांबरी,रवी बोराडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन कैलास वाघ व सचिन कांबरी यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.