चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकणारच…! – शिवसेना तालुकाप्रमुख राजा केणी
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
अलिबाग तालुक्यातील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील बेजबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्यामुळे एक युवकाचा नाहक बळी गेला आहे.यासंदर्भात जबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अन्यथा टाळे ठोकणार याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले मात्र त्याला जवळपास पंधरा दिवस होत आले तरी प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही.यामुळे आता प्रशासनाची वाट न बघता चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राला दिनांक 14 डिसेंबर 2021 टाळे ठोकणारच अशा इशारा अलिबाग तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख राजा केणी यांनी दिला आहे.
अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख राजा केणी यांनी पुढे सांगितले की,याचिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅक्टर तसेच कर्मचाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे 29 नोव्हेंबर 2021 रोजी विकास मिसाळ या अपघातग्रस्ताचा नाहक जिव गेला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनवर योग्य ती कारवाई करून त्यांना चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातुन अन्य ठिकाणी त्वरित बदली करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी नाही-तर मंगळवारी १४ डिसेंबर २०२१ रोजी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावण्यात येईल असे निवेदन शिवसेनेच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घासे आदींना 3 डिसेंबर2021 रोजी शिवसेना अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वात सदर निवेदन देण्यात आले.
यावेळी उप तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, विभाग प्रमुख योगेश जुईकर, संपर्क प्रमुख शैलेश पाटील,युवा सेनेचे संपर्क प्रमुख स्वप्नील पाटील, कुसुंबळे विभाग प्रमुख मन्मय पाटील, ताडवागळे विभाग प्रमुख अविनाश पाटील, कुर्डुस विभाग प्रमुख तुषार शेरमकर, ग्रामपंचायत सदस्य उत्तम शेठ पाटील, ग्रामपंचायत सदस्य जिवन पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रतिक अरिलकर, नविन शिर्के, युवासेनेचे अभिजीत पाटील, युवासेनेचे अक्षय पाटील, डाॅ.अविनाश पाटील, आप्पा पिंगळे, सुर्यकांत केणी, दिपक पाटील, कांचन केणी उपस्थित होते.
सदर निवेदन देवुनसुद्धा जवळपास पंधरा दिवस होत आले तरी जिल्हापरिषद प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई तर केली नाही.तसेच यासंदर्भात आमच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क साधला नाही. यावरूनच असे लक्षात येत आहे की, जिल्हापरिषदेचे सत्ताधारी आणि अधिकारी जे जाणीवपूर्वक चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी कर्मचारी यांना जाणीवपूर्वक पाठीशी घालत आहेत.काही महिन्यांपूर्वी सुद्धा येथील एक आरोग्य सेवक यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरले होते.त्यावेळी सुद्धा कोणतीही कारवाई न करता त्याला या विभागातील विद्यमान जिल्हा परिषद सदस्या यांनी पाठीशी घालण्याचे काम केले होते.जिल्हा प्रशासन यांनी येथील कर्मचारी अधिकारी यांना पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याने ते दिवसेंदिवस बेजबाबदार पणे वागत चालले आहे.असेही केणी यांनी सांगितले.
कर्मचारी अधिकारी यांच्या बेजबाबदार पणाला कुठे तरी आळा बसावा आणि त्यांनी त्यांचे कार्य योग्य पद्धतीने करावे यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिले मात्र ते त्यांचा बेजबाबदार पणा सोडत नसतील तर आम्हाला आमच्या शिवसेना पध्दतीने त्यांना धडा शिकवावा लागेल असा इशाराही देण्यात आला आहे.








Be First to Comment