सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे विभागातील मौजे चिल्हे येथील श्रीमती सुरेखा विनायक जंगम यांचे आकस्मित निधन झाल्याने जंगम परिवारावर दुःखाचे डोंगर चिल्हे गावासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत्यू समयी त्या ५७ वर्षाच्या होत्या त्यांच्या आकस्मित निधनाची वार्ता समजतात रोहा तालुका व रायगड जिल्ह्यातील जंगम समाज बांधव व विविध स्तरातील समाज बांधव अंतिमदर्शनास उपस्थित होते त्यांच्यावर चिल्हे येथील वैकुंठधाम येथे विधिवत पद्धतीने अंतसंस्कार करण्यात आले.
सुरेखाबाई ह्या मोठया कुटूंबातील अतिशय प्रेमळ व सर्वांच्या परोपकारी पडणाऱ्या तसेच स्वभावाने सर्वाना सुपरिचित होत्या महिला वर्गात मिळून मिसळून राहत असत जंगम समाज व विविध समाजातील महिलांचा देखील आदरपूर्वक सन्मान करत असत पतीच्या पश्चात त्यांनी मुलांवर चांगले संस्कार करत उच्च शिक्षण देत आज रोजगारात उच्च पदीस्त आहेत त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी, सून, दिर, जावा,नणंद, पुतणे असा मोठा जंगम परिवार आहे .तसेच त्यांचे दुःखवटा पुढील क्रियाविधी मंगळवार दिनांक १४ डिसेंबर रोजी त्यांचा राहत्या निवासस्थानी मौजे चिल्हे येथे संपन्न होणार असल्याची माहिती कुटूंबियांन प्राप्त झाली आहे.








Be First to Comment