सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंढे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज दि.12 डिसेंबर रोजी सुनिल गोगटे यांच्या जनसेवा कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुमारे 100 लाभार्थींना ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख व राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य सुनिल गोगटे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, तालुका सरचिटणीस संजय कराळे, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष शिरीष कदम, तालुका युवा अध्यक्ष प्रमोद पाटील, तालुका प्रज्ञा प्रकोष्ठ समीर सोहोनी, तालुका सहकार आघाडी संयोजक मारुती जगताप, तालुका सोशल मीडिया संयोजक मिलिंद खंडागळे, शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, युवा अध्यक्ष मयूर शितोळे,ओबीसी अध्यक्ष प्रशांत उगले, तालुका महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा गोगटे, युवा चिटणीस सर्वेश गोगटे,श्रीनिवास राव, दिनेश गणेगा, हरिश्चंद मांडे, श्रुता पाटकर,भाऊ राठोड,अर्जुन घाडगे,पूनम डेरवणकर,वसंत जाधव आदी पदाधिकारी आणि इ श्रमचे लाभार्थी उपस्थित होते.








Be First to Comment