Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन मध्ये सुरू आहे मनमानी कारभार

जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी मंडळाचे सदस्य सुरेंद्र भातीकरे यांची सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन मध्ये कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत आहे.अशी तक्रार जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी मंडळाचे सदस्य सुरेंद्र भातीकरे यांनी अलिबाग येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

सुरेंद्र भातीकरे यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार अर्जात म्हटले आहे की, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा कार्यकारी मंडळाचा सदस्य आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन सध्या घेत असलेले सर्व निर्णय उदा.- विविध वयोगटातील मुला-मुलांची निवड चाचणी बाबतचे घेतलेले निर्णय,निवड समिती वरील सदस्यांची नेमणूक बाबत निर्णय कधी व कोणी घेतले याची मला कोणतीही माहिती दिलेली नाही. ह्याविषयी माजी हरकत आहे. तसेच सर्व कारभार कार्यकारी मंडळाची सभा न घेता कोणताही अधिकृत ठराव न करता घेत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षभरात कार्यकारी मंडळाची एकही सभा झालेली नाही,सर्व निर्णय सभा न घेता झालेले आहेत, ही बाब अत्यंत गंभीर असून नियमबाह्य आहे.

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन मध्ये सुरू असलेल्या मनमानी कारभारावर माजी हरकत आहे. 14 वर्षाखालील मुलाचा क्रिकेट संघ निवडण्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने उरण येथे निवड चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे.मात्र ही निवड चाचणी घेताना कुठले निकष लावले गेले याची माहिती नाही. तरी याविषयी आपल्याकडे हरकत घेत आहे,त्याची आपण योग्य ती दखल घेऊन त्वरित रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व सचिव यांच्यावर सक्त कारवाई करावी हि विनंती करण्यात आली आहे.

रायगड प्रीमियर लीग अध्यक्ष राजेश पाटील, उपाध्यक्ष अनंत घरत, डॉ राजाराम हुलवान सचिव जयंत नाईक, खजिनदार कौस्तुभ जोशी, पंकज पंडित , सागर कांबळे, संदीप जोशी यांनी याविरुद्ध आवाज उठवून जाब विचारला.

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा कारभार हा पारदर्शकता असून उरण येथे होणारी निवड चाचणी योग्य प्रकारे आहे.आम्हाला निवड चाचणीसाठी 6 डिसेंबर2021 रोजी कळविण्यात आले.त्यानुसार आम्ही निवड चाचणी घेत आहोत. आपल्या रायगड जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील खेळाडूंची चाचणी घेण्यात येत आहे.इतर जिल्हयात त्यांची क्रिकेट ऍकेडमी असून त्यांच्या ऍकेडमीमध्ये खेळत असणाऱ्याची नावे जाहीर केले जात आहे.ज्यांनी आरोप केले आहेत त्यांनी हेतुपुरस्सर केले आहे.
चंद्रकांत मते, अध्यक्ष, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन./सदस्य,महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.