कोविड काळात गुरुजनांनी खडूफळाऐवजी ऑक्सीमीटर थर्मामीटर घेऊन केलेल्या सेवेबद्दल विशेष आदरभावना वाटते : पालकमंत्री अदिती तटकरे
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
राज्यातील देशातील जुन्या प्राथमिक शिक्षक संघाच्या कोकण विभागीय अधिवेशनासाठी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे ठिकाण निवडल्याने पालकमंत्री म्हणून उदघाटनाची संधी मिळाल्याबद्दल ऋणी आहे. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत राज्याच्या शिक्षण मंत्री ना. वर्षा गायकवाड यांच्यासमवेत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी देते, असे मत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी व्यक्त केले.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या रायगड शाखेकडून कोकण विभागीय भव्य शिक्षक मेळाव्याचे आयोजन पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथे करण्यात आले. या मेळाव्याचे उदघाटन रायगडच्या पालकमंत्री ना अदिती तटकरे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सोपान चांदे, पोलादपूर पंचायत समितीच्या सभापती नंदाताई चांदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सुधाकर घारे, जिल्हा परिषद सदस्या सुमन कुंभार व चंद्रकांत कळंबे तसेच अन्य मान्यवर तसेच शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित राहिले.
याप्रसंगी सीबीएस जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांचा सत्कार राज्याचे अध्यक्ष देवीदास बस्वदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विविध शिक्षकांना त्यांच्या शिक्षणक्षेत्रातील कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.








Be First to Comment