कल्पेश ठाकूर यांची समाजसेवा आणि अपघातग्रस्तांना मदत हे कार्य गौरवास्पद : आमदार महेंद्र दळवी
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
वयाच्या १८ ते २० वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांना सातत्याने निस्वार्थ भावनेतून मदत करणारा देवदूत कल्पेश ठाकूर असून यांची समाजसेवक ही गौरवास्पद असल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी केले.
कल्पेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी केलेल्या कार्य अहवालाच्या नुकतेच प्रकाशन आमदार महेंद्र दळवी आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पोलीस अधिकारी विभा चव्हाण, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, महावितरणचे संजय ठाकूर, राजिपचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंत घासे, शिवसेना तालुका प्रमुख तुषार मानकवले, सरपंच प्रदीप म्हात्रे आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना दळवी म्हणाले की, अपघातग्रस्त व्यक्तींना स्वतःच्या गाडीतून तातडीने रुग्णालयात दाखल करून आतापर्यंत हजारो व्यक्तींचे प्राण वाचविले आहेत.यासह महाड, पोलादपूर येथील दरडग्रस्तांना सुद्धा मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासाणारा कल्पेश ठाकूर असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार रविशेठ पाटील यांनी प्रशंसा करताना सांगितले की, कल्पेश ठाकूर च्या कार्याचा अहवाल फार मोठा आहे. अपघातग्रस्त, कोरोना काळ, दरडग्रस्त, चक्रीवादळ या सर्व गोष्टीत मदत करणारा नांव कल्पेश ठाकूरांचे आहे त्याच्या या उज्वल यशाची पायरी अशीच वर चढत राहो त्याला असंख्य नागरीकांचे आशिर्वाद लाभले असल्याने त्यांच्याकडून अशीच सेवा घडत राहणार आहे.दुस-याला कायम मदत करणे हा त्याचा गुणधर्म असल्याने त्याच्या कार्याचा आलेख चढता जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.








Be First to Comment