सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरण तालुक्यातील द्रोणागिरी परिसराचा विकास जोमाने सुरु आहे. मात्र येथे बहूउद्देशीय सांस्कृतिक भवन नसल्याने जनतेची, नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. द्रोणागिरी परिसराचा सिडको विकास करीत आहे. द्रोणागिरी परिसरात देश विदेशातील लोक राहण्यास येत आहेत. परंतु सिडकोने द्रोणागिरी शहरात कोणत्याही प्रकारचे बहूउद्देशीय सांस्कृतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत.
नागरिकांच्या सुख दुःखाच्या, विविध सणवारांना व सुख दुःखे सामूहिकरित्या साजरे करण्यासाठी कोणतेही साधन द्रोणागिरी शहरात वा परिसरात नाही. जनतेच्या,नागरिकांच्या मनोरंजनासाठी नाटक, सिनेमा गृह, भजन, कीर्तनासाठी व सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी, लग्नासाठी कोणतेही सभागृह द्रोणागिरी शहरात उपलब्ध नाही.
शास्त्रीय गायन, सुगम संगीत, साहित्य संमेलन, कवी संमेलन असे सर्व प्रकारचे मनोरंजनाचे व समाज प्रबोधनाचे कार्यक्रम बहू उद्देशीय सांस्कृतिक सभागृह नसल्याने द्रोणागिरी परिसरात असे कार्यक्रम होत नाहीत त्यामुळे द्रोणागिरी परिसरातील जनताही यामुळे नाराज आहे.
त्यामुळे सर्व प्रकारचे कार्यक्रम द्रोणागिरी शहरात व्हावेत यासाठी सिडको प्रशासनाने द्रोणागिरी शहरात त्वरित बहूउद्देशीय सांस्कृतिक भवन उभारावे अशी मागणी शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर यांनी सिडको प्रशासनाकडे लेखी पत्रव्यवहार करून केली आहे.








Be First to Comment