Press "Enter" to skip to content

कर्जत चौक महामार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत चौक महामार्गावरील खड्डे त्वरित न भरल्यास भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा पाच दिवसांपूर्वी दिला होता त्याची दखल घेवून आज दि.11 डिसेंबर रोजी रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरवात केली आहे.

कर्जत चौक महामार्गावर गेल्या अनेक दिवसापासून भले मोठे खड्डे पडलेले आहे त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना खूप त्रास होत असतो. कर्जत वासीयांना कर्जतहुन पनवेल नवी मुंबई येथे नोकरी काम धंद्यासाठी दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने रोज जा ये करावे लागते.अनेक वेळा दुचाकीस्वार या खड्ड्यात गाडी आपटून पडतात आणि खूप मोठी दुखापत होते किंवा काही वेळा जीवितहानी सुद्धा होते. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीच्यावतीने उपविभागीय अभियंता कर्जत यांना निवेदन देण्यात आले होते. त्यात कर्जत चौक रस्त्यावरील खड्डे त्वरित भरावेत अशी मागणी करण्यात आली होती. रस्ते त्वरित दुरुस्त न झाल्यास भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे नेते सुनिल गोगटे यांनी दिला होता.

यावेळी उप विभागीय अभियंता अक्षय चौधरी यांनी दोन ते तीन दिवसात खड्डे भरायला सुरवात करू असे आश्वासन दिले होते. आज दि.11 डिसेंबर रोजी रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.