Press "Enter" to skip to content

कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना उपक्रमांची माहिती

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजनेअंतर्गत कोकणातील दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नुकतेच दोन अडीच महिने पोयनाड येथे राहून शेतकऱ्यांना शेतीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी दापोली येथे होणा-या कृषी मार्गदर्शनात त्यांनी सहभाग घेऊन सर्व शेतीविषयी माहिती आत्मसात करून आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी विकासाच्या दृष्टीकोनातून पुढे गेला पाहिजे हाच उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाची माहिती शेतकऱ्यांना देतांना त्यांनी बिज प्रक्रिया कलम बनविण्याच्या अनेक पद्धती, उत्तम बुरशीनाशक बोर्डी मिश्रण त्यांचे फायदे व तयार करण्याची प्रक्रिया, भात पिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनुसरलेली एसआरआय पद्धत यासह बॅंकेच्या माध्यमातून कर्ज योजना माहिती, पेंढ्या वरील युरिया प्रक्रिया यासह एकात्मिक रोग व किड व्यवस्थापन या सर्व शेतीपूरक योजना आणि त्यांची अंमलबजावणी कशी करावी की जेणेकरून आपल्या महाराष्ट्र याहीपेक्षा सुजलाम सुफलाम होईल यांची संपूर्ण माहिती या जागृती विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी येथील शेतकऱ्यांना दिली.

यावेळी कृषी विद्यापीठातील तन्मय कांबळे, किरण कळंबटे, आशीष कांबळे, गौरव गितेे, शुभम कुंभार हे पाच कृषी विद्यार्थी कार्यरत असून याकामी त्यांना अभय चवरकर, कविता चवरकर, तुकाराम चवरकर, सुनील चवरकर, संजय चवरकर, जयश्री म्हात्रे, दत्तात्रय चवरकर या शेतकऱ्यांचे याकरिता मोलाचा प्रतिसाद व सहकार्य मिळाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.