Press "Enter" to skip to content

कर्जत मध्ये कोविड लसीकरण जनजागृती मोहीम रॅली

सिटी | कर्जत | संजय गायकवाड |

युनायटेड वे मुंबई ही संस्था कर्जत तालुक्यात कोविड लसीकरण जनजागृती मोहीम राबवित आहे, त्याचाच भाग म्हणून आज दि.10 डिसेंबर रोजी कर्जत शहरात कोविड लसीकरण जनजागृती मोहीम रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

रॅली मध्ये नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, नगरसेवक बळवंत घुमरे, युनायटेड वे च्या रायगड समन्वयक रेखा जाधव, नगरपरिषद कर्मचारी, पोलीस कर्मचारी, प्रहार अकॅडमी सदस्य, कर्जत मधील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

पोलीस मैदानावरुन निघालेली रॅली कर्जत शहरात फिरून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकामध्ये आली त्या ठीकाणी सर्वांनी शपथ घेतली, मुख्याधिकारी डॉ. पाटील यांनी कोविड महामारी अजून गेली नाही, आपले लसीचे दोन्ही डोस झाले असले तरी मास्क लावणे, वारंवार हात धुणे गरजेचे आहे,तसेच सामाजिक अंतर पाळायचे आहे असे सांगितले.

या रॅलीत नियमित हात धुवा, खोकला किंवा शिंकता तेव्हा आपला चेहरा झाकून घ्या, बाहेर जाताना नेहमीच मास्क घाला, सामाजिक अंतर कायम ठेवा आणि मोठ्या संख्येने एकत्र येणे टाळा, आपल्याला अस्वस्थ वाटत असल्यास डॉक्टरांना भेटा असे कोरोना मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.