उपमुख्यमंत्री अजीत पवारांच्या हस्ते सुदाम पाटील यांना नियुक्ती पत्र
सिटी बेल | पनवेल |
पूर्वाश्रमीचे काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याच वेळी सुदाम पाटील यांना राष्ट्रवादी मध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळेल हे निश्चित झाले होते. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले.

काल पनवेलमध्ये आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सुदाम पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल नियुक्ती पत्र देण्यात आले.








Be First to Comment