Press "Enter" to skip to content

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल (सिबीएसई), मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालयाची उभी राहणार नविन इमारत

सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी |

दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामजिक क्षेत्रातही उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या नामवंत अशा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड मध्ये असलेल्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालयाच्या तसेच नव्याने सुरु होणाऱ्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल (सिबीएसई) या विद्यालयांच्या नविन इमारतीचे भूमिपूजन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आणि संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्याप्रमुख उपस्थितीत झाले.

थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या कार्याने प्रेरित होऊन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी १९९२ साली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली. दर्जेदार शिक्षण आणि अत्यंत शिस्तप्रिय संस्था म्हणून या संस्थेचे नावलौकिक आहे. सर्व स्तरातील दर्जेदार शिक्षण देण्याचे आणि अनेक करिअर आधारित पारंपारिक आणि वैशिष्टयपूर्ण कार्यक्रमांसह प्रभावी शिक्षण आणि शिकण्याची सुविधा या संस्थेच्या माध्यमातून होत आधुनिकीकरणाच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी हि संस्था काम करीत आहे. या संस्थेचे सीकेटी महाविद्यालय (स्वायत्त), भागुबाई चांगू ठाकूर विधी विद्यालय, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल खारघर, या व अशा इतर विद्यालयांप्रमाणे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल (सिबीएसई),मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालय अविभाज्य घटक आहे. गोर गरिबांना शिक्षण मिळावे यासाठी अथक प्रयत्नाने गव्हाण विभागात २५ वर्षांपूर्वी अतिशय सुंदर अशी वास्तू बांधून शिक्षण प्रसाराचे अविरत कार्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकुर यांनी चालू ठेवले आहे. काळाची गरज लक्षात घेता उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी भव्य दिव्य शिक्षण संकुलाचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते सत्यात उतरवण्याचे काम केले.गेल्या अनेक वर्षांपासून मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालय उलवे नोड मध्ये शिक्षण दानाचे पवित्र काम करीत आहे, आणि त्याच ठिकाणी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल (सिबीएसई) हे विद्यालयही कार्यान्वित होत आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून सर्वसुविधायुक्त अशी इमारत उभारली जाणार आहे.

या भूमिपूजन सोहळ्यास जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, कार्यकारी मंडळ सदस्य व पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, संजय भगत, अजय भगत, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्वर म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, न्हावे माजी सरपंच चंद्रकांत भोईर, व्ही.के.सिंग, भार्गव ठाकूर, विश्वनाथ कोळी, जयवंत देशमुख, राधाताई ठाकूर, दर्शन ठाकूर, वसंत पाटील, दशरथ ठाकूर,अनंता ठाकूर, एम. डी. खारकर, सागर ठाकूर, सुधीर ठाकूर, कमलाकर देशमुख, कमलाकर घरत, मिनाक्षी पाटील, किशोर पाटील, साईचरण म्हात्रे, श्रीकांत भगत, सुनीता घरत, ग्रामपंचायत सदस्या योगिता भगत, तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या एस. ए. डोईफोडे, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्राचार्या गोळे मॅडम, लेखापाल सुवर्णा चौधरी, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख ज्योत्स्ना ठाकूर, यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनेउपस्थित होते.

या जागेच जागेच एक अनन्य साधारण महत्व आहे. येत्या ४ वर्षात या इमारतीचे काम पूर्ण होईल.त्यामुळे जसे पहिले इंग्लिश स्कूल या परिसरात सुरु झाले तश्याच प्रकारे या पहिल्या सीबीएसई स्कूलला प्रतिसाद मिळेल व दर्जेदार असे शिक्षण मिळेल. – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.