सिटी बेल | पनवेल |
पंचायत समिती पनवेल, लायन्स क्लब ऑफ सेंटनरी स्टिल मार्केट नवी मुंबई आणि प्राचार्य यल्लाप्पा तायाप्पा वैदु प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल मध्ये जागतिक दिव्यांग समता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
पनवेल तालुक्यातील ५० दिव्यांग विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला, कामोठे येथील सुषमा पाटील हायस्कुल येथे दिव्यांग सप्ताहाची सांगता ९ डिसेंबर रोजी करण्यात आली.या कार्यकमाचे औचित्य साधून गायन, वक्तृत्व,बादलीत चेंडू टाकणे,चित्रकला अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
जगभरात ३ डिसेंबर हा दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.त्यानिमित्ताने पंचायत समिती पनवेल, लायन्स क्लब ऑफ सेंटनरी स्टिल मार्केट नवी मुंबई आणि प्राचार्य यल्लाप्पा तायाप्पा वैदु प्रतिष्ठान यांनी या अभिनव उपक्रमाचे नियोजन केले होते. सुदृढ आणि सक्षम विद्यार्थ्यांच्या तुलनेत दिव्यांग विद्यार्थी कुठेही कमी पडत नाहीत! हा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनमानसात पोहोचत आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव होताना दिसतो.
लायन्स क्लब ऑफ सेंटनरी स्टिल मार्केट नवी मुंबई च्या अध्यक्षा योगिनी वैदू यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नैपुण्य प्राप्त दिव्यांग मुलांचा यावेळी प्रशस्तिपत्र , सन्मानचिन्ह आणि नववर्षाची डायरी देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमा करीता पनवेल तालूक्याचे गटशिक्षणाधिकारी महेश खामकर, विस्तार अधिकारी बबन म्हात्रे,गटसमन्वयक जोशी सर ,केंद्रप्रमुख म्हात्रे सर, सुषमा पाटील कामोठे शाळेचे सचिव मंदार पनवेलकर . प्राचार्य यल्लाप्पा तायाप्पा वैदू प्रतिष्ठान च्या संचालिका इंदू वैदू, प्रतिभा मंडले, जयश्री शिर्के, लायन्स क्लब सेंटनरी स्टील मार्केट अध्यक्ष योगिनी यल्लाप्पा वैदू स्नेहकूंज वृद्धाश्रम संचालक नितिन जोशी, डिस्ट्रिक्ट चेअरपरसन राजेंद्र महानुभाव उपस्थित होते.
प्राचार्य यल्लाप्पा वैदू प्रतिष्ठान कडून उपस्थीत सर्व मूलांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. समावेशित शिक्षण विशेष तज्ञ योगिता कांबळे व सविता सहाणे, ज्योती म्हात्रे ,सर्व विशेष शिक्षक , समावेशित तज्ञ, यांनी उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. सुषमा पाटील कामोठे मुख्याध्यापक म्हात्रे सर , अभिजित मटकर,चेतन गायकवाड यांनी उत्साहपूर्ण शैलीत उत्कृष्ट सुत्रसंचलन केले.पनवेल डाएट चे समता विभाग प्रमुख सागर तुपे, जेष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा समन्वयक रविंद्र विशे ,ऍडव्होकेट निरंत पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भटक्या व विमुक्त जातींच्या उद्धारासाठी माझे वडील कायम झटत आलेत.समाजातील शोषित वंचित घटकांच्या साठी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची प्रेरणा मला वडिलांच्या कडून मिळाली.त्यामुळे सामाजिक उत्तरदायित्व या भूमिकेतून जेव्हा जेव्हा अशा प्रकारे अभिनव उपक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळते तेव्हा आम्ही आवर्जून त्यात योगदान देतो.
योगिनी वैदू अध्यक्षा लायन्स क्लब ऑफ सेंटनरी स्टिल मार्केट, नवी मुंबई








Be First to Comment