Press "Enter" to skip to content

वडगाव ग्रामपंचायत हद्दीत सरपंच गौरी गडगे यांचा विकासकामांवर भर

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाची समजली जाणारी वडगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत विकास कामे करण्याकडे सरपंच गौरी महादेव गडगे यांचा अधिक कल असल्याचे दिसून येते. निवडून आल्यानंतर परिसरात प्रलंबित विकासकामे करण्याकडे

सरपंच गौरी गडगे यांनी लक्ष घालून गेल्या अडीच वर्षांत परिसराचा कायापालट करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.नुकताच ग्रामपंचायत हद्दीतील तळवली दांडवाडी येथील आदीवासी बांधवांना पाण्याचा त्रास होऊ नये यासाठी काही बांधवांना वैयक्तिक नळ कनेक्शन देण्याच्या कामाचे उद्घाटन सरपंच गौरी महादेव गडगे यांच्याहस्ते करण्यात आले.

पंधरा टक्के निधीतून तळवली माणिकनगर येथे जाणा-या विज वितरणाचे विज पोळ व विज वाहिन्या दुरुस्तीचे करण्याच्या कामाचे उद्घाटन सरपंच गौरी महादेव गडगे यांनी केले.यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदेश जगन्नाथ मालकर,सदस्या कल्पना मदन ठोंबरे,सदस्य प्रकाश पवार, सदस्या सरिता संतोष गडगे,मधुकर माळकर,मदन ठोंबरे,जयराम माळकर, जगन्नाथ मालकर, परशुराम माळकर, नथुराम माळकर, अतुल माळकर, बाळाराम वाघ,ललित गायकर,वैभव लबडे, कैलास गडगे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.