Press "Enter" to skip to content

सम्यक सामाजिक संस्थेतर्फे महापरिनिर्वाण दिन साजरा

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 65 वा महापरिनिर्वाणदिन सम्यक सामाजिक संस्थेच्या रिस येथील कार्यालयात साजरा करण्यात आला.यावेळी बुद्ध वंदना,पंचशील ग्रहण करण्यात आले.यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.     

महापरिनिर्वाणदिनाचे औचित्य साधून सुजित सोनावळे आणि शिवाजी जावळे यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहिली. हा कार्यक्रम शिवाजी जावळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल निकाडे यांनी केले.   

यावेळी सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड, उपाध्यक्ष मामा कांबळे, सचिव दीपक इंगळे, सदस्य श्रीकांत धुळणकर, तायडे सर, गणेश जावळे, मुरलीधर साळवे, मळीभाऊ कांबळे, दयानंद सरवदे,पि.पी.बरोस, मोहन कांबळे, गौतम कांबळे, संदीप वानखडे,सुजित सोनावळे, अशोक सोनवणे, सुनील निकाडे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.