तळोजा औद्योगिक विभागातील अनधिकृत कंपनीत साठविण्यात आले रासायनिक केमिकल
सिटी बेल | तळोजा | विकास पाटील |
प्रदुषणाची कहर करुन नागरिकांचे जीवन उद्धस्त करणार्या कारखान्यावर बंदी घालण्याचे आदेश सर्वोच्य न्यायालयाने प्रदूषण मंडळाला दिलेले असून देखील प्रदूषणकर्त्या कारखान्यांकडे प्रदूषण मंडळाचं दुर्लक्ष होताना दिसत आहे . त्यामुळे येथिल कारखाने बिनधास्त प्रदुषणाची आग ओकत आहेत. तेव्हा अशा कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीत वर्षानुवर्षे प्रदूषणाच्या कचाट्यात अडकलेला हा परिसर व येथील ग्रामस्थ या भयानक प्रदूषणाने हवालदिल झालेले आहेत. काही स्थानिक ग्रामस्थांना , पुढाऱ्यांना ठेकेदारी देऊन हि प्रदूषणाची शिक्षा ग्रामस्थाना दिली जात आहे. पालिका हद्दीत तोंडरे गावाजवळ स न 118/2 या जागेवर भूपेन शाह यांनी कोणतीही परवानगी न घेता गोडवून उभे केला आहे त्या गोडवूनमध्ये रासायनिक केमिकल्स ठेवण्यात आले आहे. या रासायनिक केमिकल्सने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून या खतरनाक रसायनाचा स्फोट होवून मोठी जीवित हानी होण्याची भीती ग्रामस्थांना लागली आहे.
विशेष म्हणजे प्रदूषण मंडळाला याची काहीच पडलेली दिसत नाही सकाळ , दुपार ,संध्याकाळ व मध्यरात्री मोठ्या प्रमाणात येथील कारखानदार मोठं मोठ्या चिमण्यांमधून घातक वायू सोडत असून प्रदूषण विभागाला येथील तक्रारदारांनी फ़ोन केल्यानंतर हा धूर बंद होतो मात्र कोणतीच कार्यवाही होत नसून प्रदूषणकर्त्या कंपन्यांना अभय मिळत आहे .
गेल्या वर्षी जल कायदा 1974 , व वायू कायदा 1981 अन्वये प्रदूषण करण्याऱ्या 165 कंपन्या गेल्या वर्षभरात बंद केल्या होत्या. त्या कंपन्या आता चालू करण्यात आल्या आहेत. या कंपन्यांत प्रदूषण नियंत्रण करणाऱ्या यंत्रणा न बसविता चालू करण्यात आल्या आहेत. असा कंपन्यांना अभय देेनार्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ही नगरसेविका उज्वला पाटील याांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे लेखी निवेदन केली आहे
महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत कंपन्या व त्यात बेकायदा घातक रसायन ठेवळेल्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे आधिकर पालिकेला आहेत. त्यांनी कारवाई करावी.
व्ही व्ही कीलेकर
प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी नवी मुंबई
अनधिकृत उभ्या करून त्यात रसायन साठविणाऱ्या कंपन्यांवर महानगरपालिकेचे वार्ड अधिकारी यांना कारवाईचे अधीकार आहेत त्यांनी कारवाई करावी.
विठ्ठल डाके
उपायुक्त पनवेल महानगरपालिका
तळोजा औद्योगिक विभागात अनधिकृत स न 118/2 या जागेत अनधिकृत उभ्या करण्यात आलेल्या कंपनीत विघातक रसायांचा साठा करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या रसायनाचा स्फोट झाला तर जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या महिन्यात वावंजे येथील कंपनीत स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली होती. यावेळी जीवित हानी झाली आहे.पण लोकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नगरसेविका उज्वला पाटील
पनवेल महानगरपालिका








Be First to Comment