सिटी बेल | पनवेल |
महानगरपालिका कार्यालय ते मांडवकर वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याची पाऊस आणि अवेळी झालेल्या पावसामुळें दुर्दशा झाली होती.खड्डयांमुळे परिसरातील सुवर्ण पुष्प,सिद्धिविनायक आणि इतर सोसायट्यां मधील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता.विशेष करून दुचाकी आणि छोट्या वाहनांना त्रास जास्त होता.
अवकाळी पावसाने रस्त्यावर मोठे खड्डे तयार झाले होते आणि त्यामध्ये पाणी साचून नागरिकांना येण्या जाण्यास त्रास होत होता.नगरसेवक विक्रांत पाटील यांनी स्वतः या रस्त्याची पाहणी केली आणि कॉन्ट्रॅक्टर ला सांगून जे सी बी मागवून या रस्त्यावरील खड्डे बुजवून लेवल करून घेतली. तसेच महानगरपालिकेला या रस्त्याची लवकरात लवकर डागजुगी करून घेण्यासाठी पत्रही दिले.

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे तक्रार द्याची खोटी की काम झालंच पाहिजे मग ती तक्रार तोंडी असो की फोनवर.
प्रभागाकडे जातीने लक्ष देऊन नागरिकांच्या तक्रारी नगरसेवक विक्रांत पाटील त्या तत्परतेने सोडवतात याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.








Be First to Comment