Press "Enter" to skip to content

उरण बोकडविरा येथील सिडको अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन दुचाकी दाखल

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

उरण तालुक्यात आगी लागण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यात काहीवेळा अग्निशमन दलाची मोठी गाडी जाण्यास अडचण असते. त्यावेळी आगीवर त्वरित उपाययोजना  होण्यासाठी सिडको अग्निशमन दलाच्या ताफ्यात उरण बोकडविरा येथील अग्निशमन दलात अत्यावश्यक यंत्रणेने सुसज्ज २ दुजाकी दाखल झाल्या आहेत.     

उरण तालुक्यामध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सिडको अग्निशमनदल नेहमीच एक पाऊल पुढे टाकत काम करत असते. मात्र गल्लीबोळात लागलेली आग विझवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रस्ता नसलेल्या ठिकाणी अथवा अरुंद रस्त्यावरून अग्निशमनदलाची बंब पोहचण्यास वेळ लागतो. यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास उशीर होऊन, आग अधिक अनियंत्रित होते. यावर उपाय म्हणून सिडको अग्निशमन दलाच्या ताफ्यात आता दोन दुचाकी सामिल झाल्या आहेत. यामुळे गल्लीबोळात, अरुंद रस्ते यासारख्या ठिकाणी लागलेल्या आगीवर प्राथमिक नियंत्रण मिळविण्यासाठी मदत होणार आहे.    

या दुचाकी आपल्यासोबत पाणी, ऑक्सिजन, फोम तसेच फायर होज यासारखे उपकरण घेऊन तात्काळ घटनास्थळी पोहचणार असून, प्राथमिक नियंत्रण मिळवण्याचे काम करणार आहेत. दरम्यान नागरिकांच्या सोयीसाठी नवीन मोबाईल क्रमांक देखील सिडकी अग्निशमन दलाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. आग लागल्यानंतर त्वरित ८१०४९६१९४१ व  ०२२ २७२२२१३८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून, आगीसंदर्भात माहिती देता येणार आहे.     

सदर दुजाकीमुळे त्वरित आगीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाणार आहे. परंतु आगीने उग्र स्वरूप धारण केले तर सदर दुजाकीपेक्षा मोठ्याच अग्निशमन गाड्या उपयुक्त ठरतील अशी माहिती उरण सिडको अग्निशमन दलाच्या अधिकारी वर्गांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.