पोलादपूर नगरपंचायतीच्या 17 प्रभागांमध्ये 58 उमेदवारी अर्ज ; 14 प्रभागांमध्ये 43 उमेदवार वैध
नामाप्र प्रभागांतील 14 उमेदवार रिंगणाबाहेर तर 15 उमेदवारी अर्ज अवैध
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
सर्वोच्च न्यायालयाच्या नागरिकांचा मागासप्रवर्गबाबत निकालाचा विचार करून निवडणुक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे सार्वत्रिक निवडणूकीचे रूपांतर अचानक पोटनिवडणूकीसारखे झाले आहे. नगरपंचायत पोलादपूरच्या 17 प्रभागांमध्ये अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58 उमेदवारी अर्ज दाखल झाले असताना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोलादपूर नगरपंचायतीच्या 4 नामाप्र प्रभागांमध्ये यावेळी निवडणूक होणार नसल्याने 14 उमेदवार आपोआपच रिंगणाबाहेर गेले आहेत. उर्वरित 14 प्रभागातील 15 अर्ज अवैध झाल्याने 43 उमेदवारी अर्ज रिंगणात राहिल्याचे चित्र छाननी आक्षेपानंतर दिसून येत आहेत.
आ. भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा युवा अधिकारी विकास गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उमेदवारांची नामनिर्देशन पत्र दाखल करताना राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शहर प्रमुख सुरेश पवार, महाड शहर प्रमुख नितीन पावले, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, महाड उपशहर प्रमुख निखिल शिंदे तसेच ऍड.सनी जाधव आणि पोलादपूर शहरातील शिवसेना युवा सेनेचे आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक तसेच महिला भगिनी देखील उपस्थित होत्या.
यावेळी शिवसेनेकडून प्रभाग 1 मध्ये सुनीता पार्टे आणि प्रभाग 2 साठी अस्मिता पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रभाग 3 साठी मनोज प्रजापती, प्रभाग 4 साठी रोहित सावंत, प्रभाग 5 साठी शिल्पा दरेकर, प्रभाग 6 साठी सुषमा पवार, प्रभाग 7 साठी रिमा बुरूणकर, प्रभाग 8 साठी सारिका पालकर, प्रभाग 9 साठी संगिता इंगवले, प्रभाग 11 साठी सारिका पालकर, प्रभाग 11 साठी मृगया शहा, प्रभाग 12 साठी सिध्देश शेठ, प्रभाग 13 साठी निलेश सुतार, प्रभाग 14 साठी विनायक दिक्षीत, प्रभाग 15 साठी नागेश पवार, प्रभाग 16 साठी सुरेश पवार आदींनी अधिकृत उमेदवारीसह नामनिर्देशन पत्र दाखल केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चेतन उतेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग 10 मध्ये प्रज्ञा प्रतीक सुर्वे, प्रभाग 12 मध्ये प्रज्ञा प्रतीक सुर्वे, प्रभाग 15 मध्ये तुषार अशोक पवार, प्रभाग 17 मध्ये दर्पण दिलीप दरेकर यांची नामनिर्देशनपत्रे दाखल केली.
काँग्रेस पक्षानेदेखील प्रभाग 1 मध्ये मीनल जगताप, प्रभाग 2मध्ये कल्पेश मोहिते, प्रभाग 3 मध्ये निखिल कापडेकर, प्रभाग 4 मध्ये अर्चना शिंदे, प्रभाग 5 मध्ये अपर्णा कदम, प्रभाग 6 मध्ये समिधा महाडीक, प्रभाग 7 मध्ये आशा गायकवाड, प्रभाग 8 मध्ये अनिता जांभळेकर, प्रभाग 9 मध्ये तेजश्री गरूड, प्रभाग 10 मध्ये शुभांगी चव्हाण, प्रभाग 11 मध्ये स्वप्नील भुवड, प्रभाग 12 मध्ये श्रावणी शहा, प्रभाग 13 मध्ये सचिन दुदुस्कर, प्रभाग 14 मध्ये प्रकाश भुतकर, प्रभाग 15 मध्ये शिवराज पार्टे, प्रभाग 16 मध्ये अमित भुवड, प्रभाग 17 मध्ये दिलीप भागवत या 17 अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव स्नेहल जगताप यांच्यासमवेत विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीयश जगताप तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार प्रभागांमध्ये विधानसभा अध्यक्ष माजी राजिप अध्यक्षा अपेक्षा कारेकर आणि सेवादल राष्ट्रवादी काँग्रेसचे वाय.सी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 5 मध्ये माधुरी विचारे, प्रभाग 13 मध्ये युवराज पवार, प्रभाग 15 मध्ये अनिलकुमार भोसले आणि प्रभाग 16 मध्ये अजित खेडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
भारतीय जनता पक्षातर्फे प्रसन्ना पालांडे यांनी प्रभाग 13 मधून, शीला बुटाला प्रभाग 4 मधून, रश्मी दिक्षित प्रभाग 6 मधून, अंकिता जांभळेकर यांनी प्रभाग 14 मधून तर एकनाथ कासुर्डे यांनी प्रभाग 15 मधून तर विशाखा आंबेतकर यांनी प्रभाग 3 मधून, हर्षदा बोरकर प्रभाग 7 मधून, मंजू मोरे प्रभाग 9 मधून तर प्रभाग 16 मधून नितीन बोरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
महेंद्र श्रीपती जाधव या उमेदवाराने प्रभाग 13मधून डॅडी अरूण गवळी प्रणित अखिल भारतीय सेनेतर्फे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

बुधवारी झालेल्या छाननीमध्ये काँग्रेस पक्षाचे शर्मिला दुदुस्कर, प्रियांका नांदगांवकर, शुभांगी भुवड, सारिका विचारे, समीरा महाडीक, मदार शेख आणि शुभांगी भुवड तर शिवसेनेचे स्वाती दरेकर, कल्पना सवादकर, निलीमा सुतार, रिया मोरे, प्रशांत आंब्राळे, प्रकाश गायकवाड आणि मनसेचे संदेश सुतार आणि अभासेनेच्या कोमल महेंद्र जाधव आदी 15 जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले.
पोलादपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात आघाडी झाली असूनही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत कोणताही दगाफटका होऊ मागीलवेळी काँग्रेस, शेकापक्ष व मनसे आघाडीतील शेकापक्षाच्या उमेदवाराने परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उमेश सुतार बिनविरोध निवडून आले होते; त्याची पुनरावृत्ती घडू नये यासाठी 13 डिसेंबरपर्यंत काँग्रेसकडून प्रभाग 5,13,15 आणि 16 मधील उमेदवारी अर्ज मागे न घेण्याची सावध खेळी खेळण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाची भुमिका सर्वच प्रभागात निर्णायक ठरणार असून शिवसेनेला याचा फटका बसेल अथवा काँग्रेसला याबाबत येणाऱ्या मतदानाचा कौलच ठरविणार असून मनसेकडूनही कोणाची पाठराखण केली जाईल, हे अद्याप निश्चित चित्र स्पष्ट दिसून येत नाही. प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध विजयी होण्याची शक्यता काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने रखडली असून शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांना पाच वर्षाचा कार्यकाळ विभागून देण्याच्या निर्णयामुळे शिवसेनेतील नाराज उमेदवारांनी अन्य पक्षांतून उमेदवारी मिळविण्याचे टाळून पहिल्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचाराची तयारी दर्शविली आहे.
14 नामाप्र उमेदवार रिंगणाबाहेर
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुक आयोगाने नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या आरक्षित प्रभागांतील निवडणुका रद्द केल्याने प्रभाग 2 मध्ये कल्पेश मोहिते, मनोज प्रजापती, सुरेश पवार, लहू पवार आणि संभाजी माने तसेच प्रभाग 8 मध्ये रिमा बुरूणकर आणि अनिता जांभळेकर, प्रभाग 10 मध्ये शुभांगी चव्हाण, संगिता इंगवले, प्रज्ञा सुर्वे, सायली सलागरे, प्रभाग 14 मध्ये निलेश सुतार, अंकिता जांभळेकर आणि प्रकाश भुतकर आदी 14 नामाप्र उमेदवारांचे अर्ज वैध ठरूनही ते सर्व रिंगणाबाहेर गेले आहेत.








Be First to Comment