Press "Enter" to skip to content

वाशी येथे आणखी एकाअबोली महिला रिक्षा संघटनेच्या शाखेची स्थापना

सिटी बेल |वाशी |

पनवेल परिसरात कार्यरत असणाऱ्या अबोली महिला रिक्षा संघटनेची शाखा वाशी नवी मुंबई येथे स्थापन झाली आहे वाशी येथे विस ते २५ सदस्य असून यामध्ये आणखी वाढ होणार आहे नवी मुंबई येथिल शाखे मध्ये आणखी महिलांची संख्या वाढत आसून येथील रिक्षा चालक महिलांना भेडसावणाऱ्या समस्या सोडीवण्यासाठी नवी मुंबई येथे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांची अबोली महिला रिक्षा संघटनेची स्थापना करण्यात आली तसेच सर्व रिक्षाचालक महिलांनी रितसर सभासद फॉम् भरून संघटनेत सहभागी झाल्या.

यापुर्वी पनवेल, कळंबोली,कर्जत, खोपोली, कोपरखेरणे, कल्याण,अंबरनाथ, बदलापूर, डोबिवली,मानपाडा,नेरुळ, घणसोली, रबाले,नंतर आता पुन्हा नवी मुंबई वाशी येथे शाखेची स्थापना करण्यात आली आहे या वेळी उपस्थित अबोली महिला रिक्षा संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष संतोष भगत होते तसेच नवी मुबंई वाशी येथील रिक्षा चालक महिला उपस्तीत होत्या. तर संघटने तर्फे महिलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबिवले जातात.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.