सिटी बेल | रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील जयभवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था भुवनेश्वर वरसे, रोहा रायगड या पतसंस्थेची मासिक सभा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. या सभेप्रसंगी पतसंस्थेची दिनदर्शिका २०२२ चे शानदार प्रकाशन करण्यात आले.
पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी बी सरफळे रावसाहेब यांच्या अध्यक्षाखाली पतसंस्थेच्या प्रगतीचा आढावा घेऊन संपन्न झाली. सभेमध्ये चेअरमन सरफळे यांनी उपस्थित कार्यकारी मंडळाला मोलाचे मार्गदर्शन करीत पतसंस्था आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करीत असतानाच पतसंस्थेने दूरदृष्टी ठेऊन संस्थेने नवीन स्वतःचे भव्य दिव्य कार्यालय घेतले हे पतसंस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे.
पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीबरोबरच कर्ज वसुलीसाठी कार्यकारी मंडळ व कर्मचारी यांचाही मोलाचा वाटा आहे या सभेला पतसंस्थेचे सचिव उदय मोरे, संचालक मनोहर मेहतर , दीपक जाधव, विनायक पवार, सुहास खरिवले, संचालिका विजया सरफळे , शर्वरी जाधव, सीकृत संचालक महेश बामुगडे , माजी संचालक शरद जाधव , संदीप सरफळे ,व्यवस्थापिका बंदिनी धनावडे , लिपिक नीता शिंगरूत सभासद सुनीता दीपक जाधव, हे उपस्थित होते .
दरम्यान २ डिसेम्बर पतसंस्थेचे संचालक दीपक रामचंद्र जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पतसंस्थेने काढलेल्या दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन करण्यात आले. तसेच दीपक जाधव सौ. सुनीता दीपक जाधव यांचा पतसंस्थेच्या वतीने सहपत्नी श्रीफळ शाल पुष्पगुच्छ देऊन चेअरमन सरफळे साहेब व संचालकांच्या शुभ हस्ते सत्कार करून अभिष्ट चिंतन करण्यात आले. दीपक जाधव यांनी वाढदिवसानिमित्त पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन केल्याबद्दल पतसंस्थेच्या धन्यवाद दिले. त्यावेळी दीपक जाधव यांनी सहभोजनाचा लाभ दिला. उपस्थितांचे स्वागत चेअरमन सरफळे आभार सेक्रेटरी उदय मोरे यांनी मानले.








Be First to Comment