सिटी बेल | पेण | वार्ताहर |
येणा-या नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पेण शहरात मनसेची ताकद वाढविण्यासाठी मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत आज पेण तालुक्यातील असंख्य युवकांनी पेण तालुकाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर प्रवेश केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पेण तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती या बैठकीला जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, उपाध्यक्ष अंकुश म्हात्रे, तालुकाध्यक्ष रुपेश पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सपना देशमुख, शहर अध्यक्षा निकिता पाटील, नितीन पाटील, संदेश संसारे, छाया शिंदे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जितेंद्र पाटील यांनी सांगितले की पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी सातत्याने लढत आहोत त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेला जनता साथ देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.








Be First to Comment