Press "Enter" to skip to content

बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पेण आंबेघर येथे बिल्डर कडून सागाच्या झाडांची कत्तल इतरही झाडे जमिनदोस्त

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणा-या पेण ला तिसऱ्या महामुंबईचा दर्जा प्राप्त होत असताना पेण तालुक्यात बिल्डर व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर येत असुन शहरासह लगत असणा-या गावांमध्येही बिल्डर व्यावसायिकांनी आपला बस्तान बसविला आहे त्यातच पेण पुर्व विभागातील आंबेघर येथे सुरू असणाऱ्या मंदधार हा मोठ्या संकुलासाठी सदर व्यावसायिकांने वन विभागाची कोणतेही परवानगी न घेता खाजगी जागेतील जवळपास २४ ते २५ झाडांची कत्तल केली आहे.

यामधे साग, जांभूळ, चिंच, आंबा, सीस यासह अश्या विविध जातींतील झाडांचा समावेश आहे.मात्र याकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याचे जाणवत आहे. एखाद्याला खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणच्या झाडांची कत्तल अथवा वाहतूक करावयाची असल्यास त्याला वनविभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहेे तसेच सागाच्या झाडांची कत्तल किंवा वाहतूक करण्यासही मनाई आहे. मात्र सदर बिल्डरने कोणतीही परवानगी न घेता खाजगी जागेतील
साग व इतर झाडेही जमिनदोस्त केली आहे यामुळे सदर व्यवसायीकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.

पेण आंबेघर येथे मंदधार येथील खाजगी जागेत मोठे संकुल उभे होत असताना सदर जमिनीवर असणारे साग, जांभूळ, चिंच, आंबा, सीस यासह इतर झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात केली आहे. जरी एखाद्याच्या खाजगी जागेत झाडे तोडायची असेली तरी वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे मात्र सदर व्यक्तीने वनविभागाची कोणतीही रितसर परवानगी घेतलेली नाही याबाबत आम्हाला माहिती मिळताच सदर जागेसह झाडांचा पंचनामा केला असून तो वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. यामध्ये सदर मालकावर गुन्ह्यासह दंडात्मक कारवाई होणार

के.जे.चौधरी – वनविभाग परिमंडळ पेण

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.