Press "Enter" to skip to content

दिव्यांग बांधवाला व्हीलचेअरची भेट

जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून “आरोग्यसेवा आपल्या दारी” उपक्रम

सिटी बेल | पनवेल |

विरोधी पक्ष नेते मा.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून “आरोग्यसेवा आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे रमाकांत कुंभार या दिव्यांग बांधवांला व्हीलचेअरची आवश्यकता असल्याचे आरोग्य सेविकांना कडून समजले.

रमाकांत कुंभार या दिव्यांग बांधवाशी आपुलकीने हितगुज करताना पनवेल महापालिका विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे

या मागणीची त्वरित दखल घेऊन विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांच्या हस्ते व्हीलचेयर रमाकांत कुंभार यांना सुपूर्त केले. यावेळी त्यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते व आरोग्य सेविका उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.