सिटी बेल | सानपाडा | सुनिल ठाकूर |
सानपाडा नोड़ मधिल भाजपा युवा नेते पांडुरंग आमले यानी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्याना यशवंतराव चव्हाण फाउंडेशनच्या वतीने यशवंत राव चव्हाण पुरस्कार 2020 देऊन गौरविण्यात आले.

सानपाडा येथील सौराष्ट्र हॉल मध्ये यशवंत राव चव्हाण फाउंडेशन च्या वतीने आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर आणि ठाणे जिल्ह्या चे माजी पालक मंत्री तसेच एरोली चे भाजप आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते पांडुरंग आमले याना यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले .

याच कार्यक्रमात साई भक्त महिला फाउंडेशन सानपाडा परिसरात महिला वर्गासाठी करत असलेल्या उल्लेखनिय जनहितार्थ कार्याची दखल यशवंतराव चव्हाण फाउंडेशन कडून घेण्यात आली.साई भक्त महिला फाउंडेशन या सामाजिक संघटनेलाही पुरस्काराने गौरविण्यात आले.साई भक्त महिला फाउंडेशनच्या शारदा पांडुरंग आमले व त्यांच्या महिला सहकार्यानी हा पुरस्कार स्विकारला.
सदर कार्यक्रमास भाजप चे जिल्हा अध्यक्ष भरत पाटिल आदी उपस्थित होते.








Be First to Comment