सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
विद्या प्रसारिणी सभा चौक, संचलित सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंत राव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक येथे सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन कोरोना नियम पाळून साजरा करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी योगेन्द्रभाई शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पमाला अर्पण केली.यानंतर योगेंद्र भाईंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. संविधानाचे महत्व कथन केले.शाळेच्या शिक्षिका सुवर्णा घाटे मॅडम यांनी बाबासाहेबांच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक मुळीक सर, कांबळे डी एस शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ घाटे मॅडम आणि कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्राची जाधव यांनी केले.








Be First to Comment