Press "Enter" to skip to content

परळीत उद्या हुतात्मा नाग्या कातकरी भवनाचा भव्य उदघाटन सोहळा

विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

सिटी बेल | पाली/बेणसे | धम्मशील सावंत |

सुधागड तालुका आदिवासी समाजातर्फे परळी येथे हुतात्मा नाग्या महादू कातकरी भवनाचा भव्य उदघाटन सोहळा दि(07)डिसेंबर 2021 मंगळवारी 12.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या उदघाटन सोहळ्यास पेण सुधागड रोहा मतदार संघाचे माजी आमदार धैर्यशील दादा पाटील, शेकाप नेते रा.जि.प सदस्य सुरेश शेठ खैरे , लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान चे राज्य अध्यक्ष ,नामवंत उद्योजक डॉ संजय राजाराम सोनावणे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख प्रकाशभाऊ देसाई, सभापती रमेश सुतार, उपसभापती उज्वला देसाई, आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी, पोलीस निरीक्षक विजय तायडे, गटविकास अधिकारी विजय यादव,परळी सरपंच संदेश कुंभार, जांभूळपाडा सरपंच सौ.श्रद्धा कानडे, दहीगाव सरपंच सुषमा देशमुख, हातोंड सरपंच आशा पाठारे, नवघर सरपंच स्वाती कदम, तीवरे सरपंच सुलोचना देशमुख,ऍड प्रवीण कुंभार, विठ्ठल सिंदकर, पिठू डुमना आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रम प्रसंगी ह भ प महेश पोंगडे महाराज, ह भ प काशीनाथ महाराज वागोले यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक कमिटीचे अध्यक्ष रमेश पवार, उपाध्यक्ष दगडू वाघमारे व अन्य सदस्यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.