Press "Enter" to skip to content

संस्कार म्हात्रे सर्वोत्कृष्ठ फलंदाजाने सन्मानित

कोलकता येथे संपन्न झाली १९ वर्षाखालील ऑलइंडिया डुअर्स कप २०-२० स्पर्धा

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

कोलकता येथे संपन्न झालेल्या १९ वर्षाखालील ऑलइंडिया डुअर्स कप २०-२० स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील डोंगरी गावचे सुपुत्र तथा द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे क्रीडा विभाग प्रमुख भरत म्हात्रे यांचे सुपुत्र संस्कार म्हात्रे यांनी क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी करत सर्वोत्कृष्ठ फलंदाजाचा पुरस्कार पटकविला आहे.

सदरची स्पर्धा ही २१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर रोजी कोलकत्ता येथे पार पडली. ५ राज्यातून १६ संघ सहभागी झाले होते .त्यात फोर्टव्हीव मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करत संस्कार म्हात्रेनी पहिल्याच सामन्यात पॉल चॅटर्जी कोलकाता संघाविरुद्ध २४ चेंडूत धडकेबाद ६२ धावा काढल्या. आणि गोलंदाजी करताना ४ षटकात १३ धावा देऊन २ गडी बाद करत सामनावीर पुरस्कार मिळवला. त्या नंतर आसाम आणि दिल्ली संघा विरुद्धच्या सामन्यात देखील १३६ च्या स्ट्राईक रेटने ६२ चेंडू मध्ये ९० धावा करीत गोलंदाजीत एकूण ८ षटकात ३२ धावांच्या बदल्यात ३ गडी बाद केले.संस्कार म्हात्रे च्या या धडाकेबाद कामगिरी बद्दल त्याला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजाच्या पुरस्कार मिळाला आहे .

याचा उल्लेख काही बंगाली भाषेतील वर्तमान पत्रातून सुद्धा झाला आहे .या प्रकारच्या मोठ्या राज्यस्तरीय स्पर्धेतील चमकदार कामगिरी मुळे येणाऱ्या भविष्यात रायगड मधून महाराष्ट्रासाठी अजून एखादा उत्कृष्ट फलंदाज मिळेल अशा आशा जनतेतून, क्रीडा रसिक, प्रेषकामधून
पल्लवित झाल्या आहेत. संस्कार म्हात्रे यांना सर्वोत्कृष्ठ फलंदाज पुरस्कार मिळाल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.