Press "Enter" to skip to content

रसायनीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

एच.ओ. सी. कॉलनीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी रसायनी परिसरातील अनेक अनुयायांनी येऊन अभिवादन केले.

रसायनीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन हे रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे भवन असल्याने जिल्ह्यातील अनुयायांनी रसायनीत येवून डॉ.बाबासाहेबांना अभिवादन केले.यावेळी येणार्‍या अनुयायांना चहा, नाश्ताची व्यवस्था करण्यात आली होती.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन समिती रसायनी पाताळगंगा अध्यक्ष आर. के. कांबळे, सेक्रेटरी शांताराम सोनवणे, तुराडे ग्रामपंचायत उपसरपंच
विश्वनाथ गायकवाड़, ए.बी. गायकवाड, विकास कांबळे,ए.डी.जोशी, बळीशेठ कांबळे, युवा कार्यकर्ता महादेव कांबळे, दीपक कांबळे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.