Press "Enter" to skip to content

ग्रामीण भागात बैलगाडी अग्रेसर,शेतीच्या कामात मोलाचे योगदान

वहानांच्या वापरामुळे बैलगाडी होत आहे कालबाह्य

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

ग्रामीण भागात भात शेतीची सर्वच कामे ही बैलगाडीच्या साहाय्याने केली जात आहे.बदलत्या काळात जरी वाहतुकीची साधने वाढली असली तरी सुद्धा शेतीच्या कामासाठी बैलगाडी अग्रेसर ठरत आहे.यामध्ये शेतातील भारे वाहणे,भात भरडणे,शेतामध्ये शेणखत टाकणे त्याच बरोबर वाहतूकीच्या कामासाठी वापर होत आहे.यामुळे शेतकरी वर्गांच्या प्रत्येक क्षणाला बैलगाडी मोठे योगदान ठरत आहे.शिवाय इंधनाची बचत होत असते.निसर्गाच्या कुशित निर्माण होणारे गवत हेच त्यांचे आहर असल्यामुळे शेतकरी वर्ग बैलगाडीचा वापर करीत आहे.
मात्र गेल्या काही वर्षात वहनांचा वापर वाढल्यामुळे बैलगाडी कालबाह्य होत आहे.

गेल्या काही वर्षामध्ये भात शेतीचे विभाजन झाले असून त्याच बरोबर बहुतेक भात लागवडीवर औद्योगिक कारखाने निर्माण झाले असून भात लागवड क्षेत्र कमी होत चालले आहे.त्याच बरोबर दर वर्षी नैसर्गिक प्रकोप यामुळे भात शेतीमध्ये टाकलेला पैसा वसूल होत नसल्यामुळे शेतकरी वर्गांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे.शिवाय आजची तरुण पिढी शेतीच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे.यामुळे तालुक्यातील बहुतेक भात लागवडची जमिन ओस पडल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे.

त्याच बरोबर गुरे सांभाळणे म्हणजे प्रथम त्यांच्या चारा, पाणी सोय करणे गरजेचे आहे.त्याच बरोबर पावसाळ्यात निर्माण होणारे गवत सुकले कि गुरांचे खाद्य म्हणून वापरले जाते मात्र त्याला सुद्धा वणवे लावून दिले जात असल्यामुळे गुरांच्या खाद्याचा प्रश्न ऐरणीवर येत असतो या सर्व बाबीमुळे बैलगाडी जवळ – जवळ हद्दपार होत चालली असली तरी सुद्धा ग्रामीण भागत शेतीच्या कामासाठी बैलगाडी अग्रेसर ठरत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.