Press "Enter" to skip to content

राहुल शिक्षण प्रसारक मंडळाचा 41 वा वर्धापन दिन साजरा

संविधाननिष्ठ भारताचे पाईक व्हा ! : डॉ जी के डोंगरगावकर

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

राहुल शिक्षण प्रसारक मंडळाचा 41 वा वर्धापन दिन खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालायात आज संपन्न झाला.मुंबई विद्यापीठ क्षेत्रातील सेवा निवृत्त प्राध्यापक, प्राचार्य आणि संशोधन मार्गदर्शकाचा सन्मान संस्थेचे दिवंगत संचालक स्वतंत्रसेनानी रामराव हरिराव गुरुजी , शांताबाई हाडोळतीकर, राजश्री कांबळे स्मृती निधीद्वारे गौरविण्यात आले .

संस्थेच्यावतीने पाली भाषा, पुरातत्व संशोधन आणि सामाजिक न्याय या क्षेत्रात विशेष संशोधन आणि मार्गदर्शकाला जास्तीत जास्त पाच लाख रुपये निधी शिष्यवृत्ती म्हणून देण्याचा संस्थेचा गेली अनेक वर्षांपासून चा उपक्रम आहे. या वर्षीचे संशोधन मार्गदर्शक मानकरी म्हणून मुंबई विद्यापीठातील माजी इतिहास विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. टी. आर. घोबळे यांचा गौरव भदंत डॉ. खेमधम्मो प्राचार्य मिलिंद महाविद्यालय च्या हस्ते करण्यात आला.

महाष्ट्रातील नागपूर, पुणे, मुंबई आणि नांदेड येथील रामानंद तीर्थ स्वामी विद्यापीठातून पाली भाषा विषयात पी. एचडी प्राप्त डॉ काश्यपायन, डॉ राहुल बोधी यांचा भारताचे संविधान पुष्प गुच्च आणि सन्मान चिन्ह देऊन प्रोफेसर डॉ. टी. आर. घोबळे, रत्नमाला डोंगरगावकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला . संस्थेच्या 40 वर्षातील वाटचालीचा लेखजोखा मांडला. 2 अनुदानित आणि 8 सेल्फफंडेड शाळा, 3 पदवी महाविद्यालय, 4 वसतिगृह, 1 संशोधन केंद्र आणि संस्थेच्या वतीने निशुल्क वितरणासाठी बुद्ध आणि त्याचा धम्म या सह 11 सामाजिक न्यायाशी निगडित ग्रंथ प्रकाशन करण्यात आले आहेत.लातूर आणि रायगड जिल्ह्यात संस्थेचे जाळे पसरले आहे 3000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत असे प्राचार्य वनिता सूर्यवंशी म्हणाल्या. पीएचडी संशोधकाच्या वतीने डॉ .काश्यपायन यांनी पाली भाषेची जगभरातील अवस्था आणि भारतातली स्थिती बाबतचे मार्मिक चिंतन शील विचार मांडले, काश्यपायन म्हणाले पाली भाषेला लोक मान्यता आहे सरकार पाली भाषेचा दुजाभाव करते. संस्कृत, उर्दू आणि इग्रजी भाषा अभ्यासाचे स्वतंत्र विश्वविद्यालये आहेत मात्र पाली भाषेच्या विद्यापीठाकडे सरकारचा कान-डोळा आहे. सरकारने पाली भाषा शालेय स्थरावर करून जगातला कलह मिटवण्याची शिकवण द्यावी. संस्थेने आमचा गौरव करून धन्यताव्यक्त केली सर्व सत्कार-मूर्तीच्या वतीने ऋण निर्देश केले. समारंभाचे अध्यक्ष विचारवंत डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी संस्थेच्या दिवंगत सहकार्यत रामराव गुरुजी, शांताबाई हाडोळतीकर, आणि राजश्री आनंत यांचं संस्थेतील योगदान विस्मरणीय असल्याचे म्हणाले. विचाराबरोबरच स्वयं उत्पन्नातून संस्थेला आर्थिक मदत केली. यामुळेच संस्थेच्या कामाला गती मिळाली .

भारताचे संविधान हाच राहुल शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रेरणास्थान आहे. संविधानाची उद्धेशीका हे या संस्थेचं ध्येय आहे . संविधानाला अभिप्रेत नागरिक घडवण्याची संस्कार करणे हे या संस्थेतील सर्व घटकाची जबाबदारी असल्याचं डॉ डोंगरगावकर म्हणाले. संस्था मोठ्या प्रतिकूल प्ररीस्थितीत आर्थिक दुबळ्याच्या शिक्षणाचा वसा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदेशाचे अनुपालन करत आहे असे डोंगरगावकर म्हणाले. सद्या जीवनाच्या अनेक क्षेत्रात निष्टेला महत्व आले आहे . प्रांत, घराणे , धार्मिक निष्टेला महत्व दिले जात आहे , ही निष्ठा शाळेतूनच विद्यार्थ्यांनी संस्कारीत करण्यात आली आहे . म्हणून संविधानापेक्षा अन्य निष्ठा देशाच्या अखंडतेला आणि एकीला धोका आहे. म्हणून संविधान निष्टेचे पालन करावे असे डोंगरगावकर म्हणाले.कार्यक्रमात डॉ.नेल्सन मंडेला आश्रम शाळा , समता नायक बापूसाहेब सहस्त्रबुद्धे वसतिगृह , प्रियदर्शी सम्राट अशोक संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी तसेच संस्थेतील शिक्षक कोरोना महामारीच नियम पालन करून हजर होते. प्रा संगीता जोगदंड, प्रा. एलोरा मित्रा यांनी आभार मांडले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.