Press "Enter" to skip to content

रोहा तालुका पत्रकार संघाच्या इमारतीचे होणार नूतनीकरण

रोहा तालुका पत्रकार संघाच्या जागेत ३० लाख रु. खर्चून तीन मजली उभी करणार : आमदार अनिकेत तटकरे यांची घोषणा

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

रोहा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत वरसगाव या ठिकाणी शासनाच्या जागेवर रोहा तालुका पत्रकार संघाची इमारत असून त्या इमारतीचे नूतनीकरण करुन त्या ठिकाणी ३० लाख रुपये खर्च करुन तीन मजली इमारत बांधण्यात येईल असे आश्वासन आमदार अनिकेत तटकरे यांनी दिले. यावेळी रायगड जिल्हयाच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या.

आयोजित कार्यक्रमात वरसगांव नळ पाणी पुरवठा, पद्मावती नगर ते वरसगांव कालवा डांबरीकरण रस्ता आदी विकास कामाची उद्धघाटने पार पडल्यानंतर या कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षात प्रवेश व या भागातील विकास कामाचा आढावा कथित करण्यात आल्यावर जेष्ठ पत्रकार गांधी यांनी दिलेल्या निवेदनाच्या स्विकार करुन ताबडतोब वरसगाव पत्रकार भुवनाला ३० लाख मंजूर केले जातील. या पत्रकार भुवनात ग्रंथालय, वाचकांसाठी वर्तमान पत्र, गोरगरीब विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मिळणे अशी योजना आहे. दुसऱ्या मजल्यावर वरसगाव ग्रामपंचायत कार्यालय, तिसऱ्या मजल्यावर परमपूज्य कलावती आई व बंधू यांच्यासाठी असून त्या ठिकाणी माता भगिनीना भजन बोलण्याची सोय करण्यात येईल इमारतीसाठी लागणारा निधी खासदार सुनिल तटकरे हे ही उपलब्ध करुन देतील अशी ग्वाही आ. अनिकेत तटकरे यांनी यावेळी दिली.

यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी वरसगाव नाक्यावरील गांधी बंधु तर्फे आ.अनिकेत तटकरे व रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांचा गणेशमूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी कोलाड परिसरातील राष्ट्रवादी पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.