Press "Enter" to skip to content

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची माजी आमदार मनोहर भोईर यांची मागणी

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

गेल्या दोन वर्षांत शेतकरी व विटभट्टी चालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले आहे. कोरोना संसर्गं, तौक्ते चक्रीवादळ, अवकाळी पाऊस आदी संकटातून सावरणा-या शेतकऱ्यांवर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट उभे आहे. उरण विधानसभा मतदारसंघातील उरण, पनवेल, खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या शेतीचे व नुकसानग्रस्त वीटभट्टी चालकांचे नुकसानीचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी माजी आमदार मनोहर भोईर यांनी कृषीमंत्री दादा भुसे व मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे लेखी मागणी केली आहे.

उरण, पनवेल, खालापूर तालुक्यात दुबार पिके घेणारे शेतकरी असून वाल, चवळी, मुग, भाजीपाला लागवड करत असल्यामुळे सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका माजी आमदार मानोहर भोईर यांची असून त्यासंबंधी तात्काळ योग्य ती पाऊले उचलून शेतकऱ्यांवर उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी अशी पत्राद्वारे मागणी केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.