Press "Enter" to skip to content

अलिबाग – रोहा – कणघर – वावे रस्त्याचा शुभारंभ

ज्यावेळी माझ्यावर आरोप होतील त्यादिवशी राजकारणातुन अलविदा होणार : आमदार महेंद्र दळवी यांचे बेलकडे येथे प्रतिपादन

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

बेलकडे रोहा रस्ता का होत नाही तर आमदार यांनी पंचवीस कोटी रुपये घेतले असा आरोप विरोधकांनी केले होते.याला उत्तर देताना सांगितले की,अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग तालुक्यातील बेलकडे येथे अलिबाग -रोहा- कणघर- वावे रस्त्याच्या शुभारंभ कार्यक्रमात सांगितले की, ज्यावेळी माझ्यावर आरोप होतील त्यादिवशी राजकारणातुन अलविदा होणार.

यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे,रायगड जिल्हा परिषदेच्या सेना गटनेत्या मानसी दळवी,नियोजन मंडळाचे सद्जीसदस्य संतोष निगडे,माजी पंचायत समिती सदस्य श्रीधर भोपी, जिल्हा परिषद सदस्य बाळा तेलंगे,काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीचे जेष्ठ नेते अनंत गोंधळी,सुरेश म्हात्रे,अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी,चेंढरे विभाग प्रमुख शंकर गुरव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुखदेव आदी मान्यवरांच्या उपस्थित होते.

यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले की,आता अलिबाग -रोहा- कणघर- वावे हा रस्त्याच्या कामास सुरवात झाली की परिवर्तन होणार आहे आणि हे परिवर्तन तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात होणार आहे.सांबर कुंडाचे काम कोणी आणले आणि दुसऱ्या दिवशी विरोधकांनी वतर्मनपत्रात बातमी सुद्धा दिली गेली.त्यांना खोटे बोलण्याची सवय लागली आहे.खोटे बोलणे ही कला आहे मात्र विरोधक आता खोटे बोलत असताना त्यांनी सर्व हद्द पार केल्या आहेत.आता ते दिशाहीन झाले असून त्यांचे कुटुंबसुद्धा विखुरले आहेत.यविरोधक यांच्याकडे त्यांचे शेवटचे हत्यार म्हणून जिल्हापरिषद आहे.ती हातून गेली की त्यांना डब्बे घेऊन कामावर जावे लागेल.त्यांनी काहीही आरोप करावे आणि आम्ही ऐकावे तसे नाही.आम्ही वरिष्ठांचा आदर करतो.वरिष्ठांना खालच्या पातळीवर बोलण्याची पद्धत ही फक्त त्यांच्याकडेच आहे.जनतेने मला सेवा करण्याची आमदार म्हणून संधी दिली आहे.जनतेच्या विश्वासाला तडा न जाता त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ कशाप्रकारे देता येईल यासाठी प्रयत्नकरणार आहे.असे सांगितले.तसेच रस्ता हा चांगला झाला पाहिजे या रस्त्याच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा पणा सहन केला जाणार नाही असाही इशारा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांना यावेळी दिला.

यावेळी अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुखदेव यांनी सांगितले की,रायगड जिल्ह्यातील अलिबाग -रोहा- कणघर- वावे रस्ता राज्य महामार्ग क्रमांक९१ किमी ०/००ते ८५/६०० सुधारणा करणे,सदर काम हायब्रीड ऍनयूएटी कार्यक्रमांतर्गत रु.२१५.८८कोटींची किंमतीचे मंजूर आहे.ठेकेदारास लेटर ऑफ अवॉर्ड दि.१६डिसेंबर२०१९ रोजी देण्यात आले असून१३ ऑगस्ट२०२०राजी करार करण्यात आलेले आहे.

दिनांक२५नोव्हेंबर२०२१रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.स्वीकृत निविदाची रक्कम रु.१७७.७९कोटी आहे.सदर काम पूर्ण करण्याचा कालावधी तीन वर्षे असून देखभालीचा कालावधी हा दहावर्षाचा आहे.सदर रस्त्यावर अस्तित्वात असलेल्या १५५ मोऱ्याची पूर्णबांधणी करणे,३३स्लॅब ड्रेनची पूर्णबांधणी करणे,२३लहान पुलाची पूर्णबांधणी करणे.तसेच सुधारणा करण्याच्या लांबी मध्ये0 गावातील भाग क्रॉंक्रिटिकरण करणे, सुधारणा करण्याच्या लांबी मध्ये डी.बी .एम ६०मी.मी. ९०मी.मी. व बी.सी.४०मी.मी.करणे.आदीसहित रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.

यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, काँग्रेसचे नेते अनंत गोंधळी यांनी मनोगत व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.