Press "Enter" to skip to content

लक्ष्मीकांत वाचनालयात गरूड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत शहरातील श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथसंग्रहालया मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विशेषत: राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयात येत असतात. या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यां च्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ‘गरूड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून केंद्राचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दीपक बेहेरे, कार्याध्यक्ष पद्माकर गांगल, कार्यवाह सुचिता जोगळेकर, सहकार्यवाह सुधाकर निमकर सदस्य सदानंद जोशी आदी उपस्थित होते.

बेहेरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ग्रंथपाल रामदास गायकवाड यांनी प्रास्ताविकात, ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. 2 जानेवारी 2021 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन केंद्राचा लाभ मिळणार आहे.’ असे स्पष्ट केले त्यानंतर दूरद्दष्यप्रणालीच्या माध्यमातून थेट प्रेक्षपणाद्वारे विद्यार्थ्यांस मार्गदर्शन करण्याचा शुभारंभ करण्यात आला. शासकीय सेवेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. सूत्रसंचालन सुचिता जोगळेकर यांनी केले. याप्रसंगी मंडल अधिकारी अप्पा राठोड, दहिवली सजाचे तलाठी वैभव आंबोलकर, नरेश महाडिक, संस्थेचे कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.