Press "Enter" to skip to content

दरवर्षी १५ हजार नेत्र शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट

आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेलमध्ये ५०० मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न

सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी |

नवीन पनवेल येथील आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलच्यावतीने दोन महिन्यात रायगड जिल्ह्यातील ५०० रूग्णांच्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या असून हे नेत्र यज्ञाचे काम असेच सुरू रहाणार असल्याचे रूग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल ट्रस्ट आणि शंकरा आय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथील आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल येथे नागरिकांना सेवा देत आहे. शंकरा आय फाउंडेशन हे श्री कांची कामकोटी मेडिकल ट्रस्टचा एक भाग असून नेत्रचिकित्सेमध्ये ४४ वर्षे निरंतर काम केले आहे. तर आर झुनझुनवाला संकरा आय हॉस्पिटल हे जागतिक दर्जाची नेत्रचिकित्सा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित आहे.

नवीन पनवेल शहराच्या मध्यभागी स्थापित केलेले हे सेवा केंद्र ८१ हजार ३६४ चौरस फुट जागेत विस्तारलेेले असून यामध्ये एकाच छताखाली अत्याधुनिक व सर्व प्रकारच्या नेत्रसेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच या सेवा केंद्रात दरवर्षी १५ हजार नेत्र शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात. नविन पनवेल येथील आर झुनझुनवाला संकरा आय हॉस्पिटल येथे सर्व प्रकारच्या सुविधा सुरु करण्यासाठी या कर्मचार्‍यांची पहिली बॅच सज्ज झाले आहे. या केंद्रासाठी आवश्यक असलेल्या या बॅचमधील सर्व कर्मचार्‍यांना गेल्या दोन वर्षांपासून कोईम्बतूर येथील संकरा आय फाउंडेशनच्या केंद्रात प्रशिक्षण दिले जात आहे.

शंकरा आय फाउंडेशन इंडिया यांच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी अशा वंदे मातरम या नेत्र आरोग्यसेवा कार्यक्रमाचे लक्ष्य भारतातील प्रत्येक राज्यात नेत्रसेवा पोहोचविणे हे आहे. आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल हे समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचून जागतिक दर्जाच्या नेत्रसेवा किफायतशीर दरात उपलब्ध करून देईल. आवश्यकमूलभूत उद्देश्य,पारदर्शी दृष्टीकोन,एक अत्यंत कुशल व वचनबध्द टीम,प्रकिया व प्रणाली,आसपासच्या समुदायांचा पाठिंबा,उपक्रमाचा अविभाज्य भाग म्हणून मानव संसाधन विकास,सर्व आशिर्वाद व आचार्य यांचे संकल्प या सर्व गोष्टींना एकत्रित करून शंकरा यांनी देशातील एक प्रमुख डोळ्यांची देखभाल करणार्‍या संस्थेची निर्मिती केली आहे. नविन पनवेल येथील हॉस्पिटलचे हे १२ वे केंद्र आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.