Press "Enter" to skip to content

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाकर जोशी यांच्या प्रयत्नांना यश

पेठपाडा, रांजणपाडा आणि मुर्बीपाडा या पाडयांचे गावठाण नगर भूमापन सर्वेक्षण करण्याचे आदेश

सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी |

तालुक्यातील ओवे विभागातील पेठपाडा, रांजणपाडा आणि मुर्बीपाडा या पाडयांचे गावठाण नगर भूमापन सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने संबधित विभागाला दिले असून आता या पाडयांना महसूल दर्जा प्राप्त होणार आहे. या कामी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे पनवेल तालुका संघटक प्रभाकर जोशी यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कामी आला आहे.

ओवे या मूळ गावठाणाचे सर्वेक्षण झाले होते. मात्र या विभागातील पेठपाडा, रांजणपाडा आणि मुर्बीपाडा या पाडयांचे गावठाण नगर भूमापन सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने भूमी अभिलेख जिल्हा अधिक्षक यांना दिले. आणि त्या अनुषंगाने भूमी अभिलेख जिल्हा अधिक्षक यांनी तात्काळ कार्यवाहीसाठी भूमी अभिलेख पनवेल उप अधिक्षक यांना आदेश दिले आहेत. या सर्वेक्षणामुळे या तिन्ही पाडयांना महसुली गावाचा दर्जा प्राप्त होणार असून येथील नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर व प्रभाकर जोशी यांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.