Press "Enter" to skip to content

चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकणार : शिवसेनेचा इशारा

अपघातग्रस्त तरुणाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅक्टर तसेच कर्मचाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे २७ नोव्हेंबर रोजी विकास मिसाळ या अपघात ग्रस्ताचा नाहक जिव गेला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनवर योग्य ती कारवाई करून त्यांना चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातुन अन्य ठिकाणी त्वरित बदली करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी नाही-तर मंगळवारी १४डिसेंबर २०२१ रोजी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावण्यात येईल असे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले.

रा.जि.प च्या अध्यक्षा कु.पारधी मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.किरण पाटील तसेच रायगड जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे यांना शिवसेना अलिबाग तालुकाप्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वात सदर निवेदन देण्यात आले.

यावेळी उप तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, विभाग प्रमुख योगेश जुईकर, संपर्क प्रमुख शैलेश पाटील,युवा सेनेचे संपर्क प्रमुख स्वप्नील पाटील कुसुंबळे विभाग प्रमुख मन्मय पाटील ताडवागळे विभाग प्रमुख अविनाश पाटील कुर्डुस विभाग प्रमुख तुषार शेरमकर ग्रामपंचायत सदस्य उत्तम शेठ पाटील ग्रामपंचायत सदस्य जिवन पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रतिक अरिलकर नविन शिर्के युवासेनेचे अभिजीत पाटील युवासेनेचे
अक्षय पाटील डाॅ.अविनाश पाटील आप्पा पिंगळे सुर्यकांत केणी दिपक पाटील कांचन केणी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.