सिटी बेल | शिहू | प्रतिनिधी |
रायगड जिल्हासह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे ग्रामीण भागातील शिहू, चोले, गांधे, तरसेत, जांभूळटेप सह अनेक शेतकऱ्यांनाअवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
या अवकाळी पावसामुळे भातपिकासह, भाजीपाला व कडधान्ये पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. रायगड सह बऱ्याच तालुक्यात बुधवार व गुरुवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावळ्यामुले सर्वांचीच तारांबल उडाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्हात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बुधवार व गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाताची मळणी व भाजीपाला लागवड केलेल्या जागेत पानी साचून राहिल्यामुळे रोप पूर्ण कुजून गेली आहेत तसेच भाताच्या मळणी मध्ये पाणी गेल्यामुळे गुरांच्या वैरणीचा प्रश्न ऐरनीवर आला आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या मुळे आता पुढे जगायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांनसमोर आहे. शासनस्तरावर आता कोणता निर्णय घेतला जाईल या कडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
Be First to Comment