सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू |
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार इ. 1 ली ते 4 थीचे वर्ग सुरु करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवसाचे महत्व लक्षात घेवून जासई सरपंच संतोष रामचंद्र घरत व सामाजिक संस्था जासईच्या अध्यक्षा सौ. अर्चना संतोष घरत यांच्याकडून रु. 12 हजार किंमतीच्या 20 खुर्च्या व 5 टेबल तसेच सौ. सारीका विनायक घरत यांच्याकडून 1 लॉपटॉप व 1 प्रिंटर शाळेस भेट देण्यात आला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी सरपंच संतोष घरत, सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. अर्चना संतोष घरत उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षा सौ. निता घरत, उपाध्यक्ष गणेश पाटील, कमिटी सदस्या सौ. जयश्री घरत, सौ. परवीन शेख व सारीका घरत, मुख्याध्यापिका सौ. स्नेहल भोसले, हर्षद घरत व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रुपेश पाटील यांनी केले तर मनोगत दिपक पाटील यांनी मांडले.








Be First to Comment