Press "Enter" to skip to content

शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांचे घर जळून खाक

भिषण आगीत घराचे अंदाजे ८ लाखांचे नुकसान

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

काल पासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा फटका अनेकांना बसला आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांच्या उरण कोटनाका येथील घरात शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती. त्यामध्ये घराचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सदर नुकसान हे ७ ते ८ लाखाच्या वरती असल्याचे बोलले जात आहे. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

काल अवकाळी पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी झोडपून काढले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी घरातील विद्युत उपकरणे जळाली आहेत. शिवसेनेचे रायगड उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांच्या घरातील काल सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास एका रूमला अचानक आग लागली. रुम बंद असल्याने विद्युत उपकरणांचा स्फोट होत गेले. तसेच कपाट जळाले व भिंतीला तडे जाऊन सिलिंग पूर्णपणे उध्वस्त झाली. यावेळी सुदैवाने सदर रूममध्ये कोणी नसल्याने जीवितहानी टळली आहे.

घटनास्थळी पोलीस व तलाठी यांनी येऊन पहाणी करून पंचनामा केला आहे. सदर रूमची पहाणी केली असता अंदाजे ७ ते ८ लाखांच्या वरती खर्च येणार असल्याचे बोलले जात आहे. तरी पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे जनतेने विद्युत उपकरणे हाताळताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.