प्रशिक्षण पुर्ण करणा-या महिलांना केले प्रमाणपत्राचे वाटप
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी-पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी हद्दीतील पेहचान प्रोजेक्ट, इंदेमिस्तू ल्युब् प्रा.ली व येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने काळिवली येथे शिवणकाम प्रशिक्षण व तीन महिने शिवणकाम प्रशिक्षण पुर्ण केलेल्या 28 महिला प्रशिक्षणार्थींना शिवणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
या शिवणकाम प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन चावणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका वैशाली जाधव यांच्याहस्ते संपन्न झाले.याप्रसंगी ग्रामसेविका जाधव मॅडम यांनी उपस्थित महीलांना मार्गदर्शन करताना सांगितले की जीवनामध्ये अशी संधी पुन्हा नाही मिळत ह्या संधीचा पुरेपूर वापर करून घ्यावा,उद्योगामध्ये सामील झाले तर त्या व्यक्तीला आपल्या जीवनमान सुधारण्याची संधी मिळते. शिवणकाम शिकल्याने महिलांना घरबसल्या काहिअंश रोजगाराची संधी मिळणार आहे असे ग्रामसेविका जाधव यांनी सांगितले.

यावेळी सवणे,चावणे व मोदी माळवाडी येथील शिवणकाम प्रशिक्षण पुर्ण केलेल्या 28 महिलांना प्रशिक्षण प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी बाजीराव मेंगाने, साक्षी पाटील ,अस्मिता कचरे, समिक्षा प्रशिक्षका सुत्र संचालन जोस्ना देशमुख यांनी व्यक्त केली.








Be First to Comment