Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रसायनीचा कार्यक्रम उत्साहात

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मोहोपाडा रसायनी शाखेचा पहिला जाहीर कार्यक्रम मोहोपाडा येथील जनता विद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला.

संविधान दिन व महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतिदिनाचे औचित्य साधून ‘जोतिबांचे कार्य व संविधानिक मूल्ये’ यावर वृषाली मगदूम (स्त्री मुक्ती संघटना) यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आले होतं. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. याचवेळी पनवेल शाखेच्या वतीने ‘सापडलं रे सापडलं’ हे संविधानावरचं रिंगण नाट्यही सादर करण्यात आलं.रसायनी शाखेचा हा पहिलाच कार्यक्रम उत्साह वाढवणारा ठरला.
शाखेचे कार्यकर्ते रोहिदास कवळे, प्राजक्ता कवळे, प्राची शेळके, राजन ताटे,आरती नाईक, महेंद्र, संदेश यांनी सर्व नियोजन केले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.