सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
सुतारवाडी पासून पाच कि.मी. अंतरावर असणाऱ्या जावटे गावाकडे जाणारा छोटा पूल हा जणु गवतात हरवला असून या पुलाचे कठडे तुटलेले असल्यामुळे या मार्गांवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
या मार्गावरून भाले,निजामपुर, इंदापुर, माणगाव या मार्गाकडे जाणारा नजीकचा व सुसज्ज रस्ता असल्यामुळे या मार्गावरून टुव्हीलर,रिक्षा, मिनिडोअर,फोरव्हीलर, एसटी ही वाहने जात असतात.परंतु हा पूल अरुंद असल्यामुळे व प्रचंड वाढलेल्या गवातमुळे लवकर वाहन चालकाच्या लक्षात येत नसल्यमुळे एखादा वाहन १० ते १२ फूट खोलवर जाऊन अपघातात होऊ शकतो व कोणाचाही नाहक बळी जाऊ शकतो यामुळे असा धोका निर्माण होण्यापुर्वी संबंधित बांधकाम खाते यांच्याकडून लक्ष देणे गरजेचे आहे.
या वर्षी डिसेंबर महिना सुरु झाला तरी वेळोवेळी पाऊस पडत आहे. यामुळे जागोजागी वाढणाऱ्या गवताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येते.अशाच गवताने वेढलेला पुलाचा भाग जणु गायब झाला असून गेली दहा वर्षपासून या पुलाचे संवरक्षण कठडे तुटलेले असल्यामुळे या पुलाला नवीन कठडे बसविण्यात यावे अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.








Be First to Comment